विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मानले मराठा क्रांती स्वराज्य संस्थेचे आभार – अभिजित दरेकर

आंतरराष्ट्रीय बॉक्सर श्री प्रमोद शिवाजीराव भोसले यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय खेल रत्न पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल आज त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
मुंबई : बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास देशभरातून संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी पुणे येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रमोदराव शिवाजीराव भोसले यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे “खेल रत्न पुरस्कार” प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल पुण्यातील शिव पार्वती विकास मंडळातर्फे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संघटनेच्या सामाजिक व प्रेरणादायी कार्याचे कौतुक केले असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत माहिती देताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तसेच दैनिक बेधडक महाराष्ट्र चे संपादक, न्यूज नेटवर्क मालक, मुद्रक व प्रकाशक अभिजित दरेकर यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करत सर्व मान्यवरांचे आभार मानले.




