नाशिक येथे माणुसकी सेवा गौरव पुरस्कारांसह भव्य राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
नाशिक, बेधडक महाराष्ट्र


नाशिक : भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती यांच्या वतीने “जागो ग्राहक जागी” या ब्रीदवाक्याखाली भव्य राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ तसेच वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा गौरवपूर्ण सोहळा रविवार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी नाशिक येथील न्यू ग्रँड शेवंता बँक्वेट हॉल, हॉटेल जत्रा, नांदूर नाका येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यामध्ये माणुसकी सेवा गौरव पुरस्कार अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कर्तृत्व गाजवणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्याचा हा भव्य उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार, राष्ट्रीय कृषिरत्न पुरस्कार, कलावंत / साहित्यरत्न पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार, राष्ट्रीय आरोग्यदूत गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, रणरागिणी स्त्री गौरव पुरस्कार तसेच राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, कृषी, साहित्य, कला, उद्योग, महिला सशक्तीकरण आणि ग्राहक संरक्षण या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरविण्यात येणार आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळावे, त्यांचे कार्य सर्वांसमोर यावे आणि इतरांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य कार्यक्रमासाठी अंतिम नोंदणीची तारीख 10 फेब्रुवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली असून इच्छुक मान्यवरांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमास राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, उद्योजक, डॉक्टर, शेतकरी प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे नेतृत्व मा. दादाभाऊ केदारे (राष्ट्रीय अध्यक्ष) आणि डॉ. अविनाश झोटिंग (राष्ट्रीय सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 7261999222 किंवा 9420321544 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहक हक्कांची जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या मूल्यांची जपणूक हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून, या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा सोहळा नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत मा.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष व डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव.त्याच बरोबर श्री.रामचंद्र ताठे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष.
आर्कि.अक्षय कोठावदे जिल्हाध्यक्ष नाशिक.श्री.भागवत इरतकर नाशिक शहर अध्यक्ष आद आयोजकांनी व्यक्त केले आहे.




