Uncategorized

आर्यदीप हॉटेल च्या महिला कर्मचारी निर्मलाबाई झाल्टे यांची ईमानदारी, रूमची साफसफाई करतांना सापडलेले १५०००/रु,पॅनकार्ड, आधारकार्ड केले परत, महिलेचे कौतुक

 सोयगाव न्यूज नेटवर्क जब्बार तडवी 

गुजरात मधील अहमदाबाद येथील कुटुंब फर्दापूर येथील आर्यदीप हॉटेल वर तीन दिवस मुक्कामी होते. दि.०४ मंगळवारी त्यांनी लॉज सोडली.त्यांच्या रूमची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या लॉज च्या महिला कर्मचाऱ्याला त्यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड व रोख रक्कम १५००० रु मिळून आल्याची माहिती आर्यदीप हॉटेल चे संचालक दीपक जैस्वाल यांना महिला कर्मचारी निर्मलाबाई झाल्टे यांनी दिली. क्षणाची ही विलंब न करता संबंधितांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड व १५००० रु परत केल्याने या ईमानदार महिलेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील हमीदभाई हे मुलासाठी सोयगाव तालुक्यातील ठाणा येथे दि.०१ शनिवारी मुलगी बघण्यासाठी येत असताना फर्दापूर येथे येण्यास रात्री साडे अकरा वाजले. इतक्या रात्री कसे घरी जायचे या विचाराने ते फर्दापूर येथील आर्यदीप हॉटेल वर थांबले. रविवारी मुलगी बघण्यासाठी ठाणा येथे गेले. त्यांना मुलगी पसंद पडल्याने त्यांनी मंगळवारी विवाह करण्याचे ठरल्याने ते हॉटेल वरच मुक्कामी थांबले. मंगळवारी मुलाचा विवाह झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी आर्यदीप हॉटेल सोडत अहमदाबाद येथे जाण्यास निघाले. हमीदभाई कुटुंबा सह ज्या रूम मध्ये थांबले होते.त्या आर्यदीप लॉज च्या रूमची साफसफाई करण्यासाठी हॉटेल च्या महिला कर्मचारी निर्मलाबाई झाल्टे या रूम मध्ये गेल्या, साफसफाई करीत असताना त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड व १५०००/रु सापडले. त्यांनी लगेच आर्यदीप हॉटेल चे संचालक दीपक जैस्वाल यांना माहिती दिली. जैस्वाल यांनी क्षणाचाही विलंब न करता भ्रमणध्वनीद्वारे हमीदभाई यांच्याशी संपर्क साधला. हमीदभाई हे काही वेळाने हॉटेल ला आले. त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व १५०००/रु त्यांना परत करण्यात आले. हमीदभाई यांनी निर्मलाबाई झाल्टे यांना ५०० रु बक्षीस दिले. आर्यदीप हॉटेलचे संचालक दीपक जैस्वाल व निर्मलाबाई झाल्टे यांचे आभार मानले. निर्मलाबाई झाल्टे यांनी दाखविलेल्या इमानदारीने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!