कर्तव्याची जाणीव आणि दातृत्वाचा वसा: मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा लोककल्याणकारी संकल्प- गुरुदेव झेंडे


मुंबई: बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कल्याण डोंबिवली प्रवक्ते गणेशराजे मोरे यांनी सांगितले.
‘स्वराज्य’ हा केवळ एक शब्द नाही, तर ती एक संस्कृती आहे—गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकीची ऊब पोहोचवण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच लोककल्याणकारी विचार डोळ्यांसमोर ठेवून मराठा क्रांती स्वराज्य संघटना भारत सरकार मान्यता प्राप्त संघटनेच्या वतीने आज समाजात परिवर्तनाचे आणि सेवेचे एक नवे पर्व घडवत आहे. येत्या रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी खार (पश्चिम) येथील पाली पठार येथे आयोजित करण्यात आलेला ‘मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप’ उपक्रम म्हणजे या संघटनेच्या सामाजिक बांधिलकीची आणि दातृत्व भावनेची प्रचिती आहे.
*नेतृत्वाचा भक्कम पाया आणि दातृत्वाची संकल्पना*
कोणतीही संघटना ही केवळ पदांनी मोठी होत नाही, तर ती नेतृत्वाच्या विचारांनी आणि कृतीने मोठी होते. *संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदानंदराव भोसले साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली या दातृत्वाचा पाया रचला गेला आहे. भोसले साहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वाभिमान, दयाळूपणा आणि समाजहितासाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व. त्यांच्याच प्रेरणेतून समाजातील गरजू कुटुंबांना आधाराचा हात देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आकारास आला आहे.
या कार्यात त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. चंद्रकांत मोजाड साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण साहेब यांच्यासारख्या अभ्यासू व संघटनात्मक कौशल्याने परिपूर्ण असलेल्या सहकाऱ्यांची खंबीर साथ लाभली आहे. प्रशासकीय शिस्त आणि सामाजिक भान यांचा सुरेख संगम या नेतृत्वात दिसून येतो.
*कर्तृत्वाचे आणि ऊर्जेचे प्रतीक: धडाडीचे नेतृत्व*
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मैदानात उतरलेले महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. गुरूदेव (भाई) द. झेंडे यांचे नेतृत्व कौशल्याचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यांच्यासोबतच, मुंबई प्रदेशाच्या महिला अध्यक्ष सौ. आरती दळवी यांच्या रूपाने संघटनेला एक कर्तृत्ववान, धडाडीची आणि रणरागिणी महिला नेतृत्व लाभले आहे. आपल्या कार्यसम्राट कार्यपद्धतीने त्यांनी केवळ महिलांचे संघटन केले नाही, तर समाजातील वंचितांच्या वेदना ओळखून या मदतकार्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पेलली आहे.
*अन्नदान हेच श्रेष्ठ दान: जबाबदारीची जाणीव*
आजच्या महागाईच्या आणि धावपळीच्या युगात अनेक सर्वसामान्य कुटुंबांना जीवन जगताना संघर्षाला सामोरे जावे लागते. अशा वेळी केवळ घोषणा न करता, प्रत्यक्ष कृतीतून लोकांच्या ताटात अन्न आणि हातात जीवनावश्यक वस्तू देणे हीच खरी ईशसेवा आहे. रविवार, २३ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजता खार येथील पाली पठार येथे होणारा हा कार्यक्रम केवळ एक वाटप सोहळा नाही, तर ती समाजाप्रती असलेल्या ‘ऋण’ फेडण्याची एक प्रामाणिक धडपड आहे.
आपल्या मराठा क्रांती स्वराज्य संघटनेने कार्यातून हे सिद्ध केले आहे की, जेव्हा विचारांना दातृत्वाची जोड मिळते, तेव्हा समाज बदलतो. सदानंदराव भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखालील ही संपूर्ण टीम आज मुंबईत सेवेचा एक नवा आदर्श उभा करत आहे. या लोककल्याणकारी उपक्रमाला मनापासून शुभेच्छा..!!!




