कर्जत नगरपरिषदेत रिक्षा चालकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा
रिक्षा थांबे, वाहतूक व्यवस्था व प्रवाशांच्या सुविधांबाबत उपाययोजनांवर भर देणार

कर्जत
कर्जत नगरपरिषद येथे कर्जत रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व रिक्षा चालक यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्षा चालकांच्या विविध समस्या तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कर्जत शहरातील रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या समस्या, रिक्षा थांबे, वाहतूक व्यवस्था, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा तसेच शहरातील वाहतुकीशी संबंधित विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले. रिक्षा चालक हे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या अडचणी व मागण्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच रिक्षा चालक,नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधून कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे, मुख्याधिकारी श्री. तानाजी चव्हाण, आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष श्री. संतोष पाटील, कर्जत पोलीस स्टेशनचे DYSP श्री. राहुलजी गायकवाड, बांधकाम सभापती तथा नगरसेवक श्री. महेंद्र बबन चंदन (पाटील), विरोधी पक्ष गटनेते श्री. संकेत भासे, तसेच कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक व नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी, रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयातून तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला.




