ओम प्रशांत मोरेची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी ; तबला वादनात पुरस्कारांची कमाई

अंबरनाथ : अंबरनाथ येथील गुरुकृपा संगीतालयातील प्रतिभावान तबलावादक ओम प्रशांत मोरे याने राष्ट्रीय स्तरावरील संगीत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अंबरनाथच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध राष्ट्रीय कला व सांस्कृतिक महोत्सवांमध्ये सहभागी होत ओमने आपल्या तबला वादनाच्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली असून त्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मानपत्र व पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे यांच्या वतीने आयोजित National Art Talent Search (NATS) – All India Multi-lingual Drama, Dance, Music Contest/Fest अंतर्गत झालेल्या २२ व्या Cultural Forum of Performing Arts 2026 मध्ये ओम प्रशांत मोरे याने ज्युनियर गटातून सहभाग घेतला. २१ मे ते १ जूनदरम्यान पुणे, महाराष्ट्र येथे झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत Instrumental – Taal प्रकारात त्याने आपले तबला वादन सादर केले. या कामगिरीबद्दल त्याला Certificate of Honour प्रदान करण्यात आले.
ओम हा गुरुकृपा संगीतालय, अंबरनाथ – Maestro Taal Groupशी संबंधित असून, लहान वयातच त्याने तबला वादनामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर आपल्या कलेचे सादरीकरण करत त्याने परीक्षकांची दाद मिळवली.




