टॉप न्यूज़

स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय”तर्फे पळसदरी ठाकूरवाडी व तिघर शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

बेधडक महाराष्ट्र | कर्जत

“श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी” यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील रा. जि.प. शाळा पळसदरी ठाकूरवाडी आणि रा. जि.प. उच्च प्राथमिक शाळा तिघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत दरेकर यांच्या सूचनेनुसार दत्तात्रय दरेकर आणि अभिजीत दरेकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. त्यांच्या या सामाजिक सहभागामुळे दोन्ही गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पळसदरी ठाकूरवाडी शाळेत वाटप
इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन, चित्रकलेचे साहित्य तसेच इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर साहित्य मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.
शाळेच्या शिक्षकांनी सेवा केंद्राचे आभार मानताना नमूद केले की, ग्रामीण भागातील शाळांसाठी अशा मदतीची अत्यंत आवश्यकता आहे.

तिघर येथील उच्च प्राथमिक शाळेत १ ली ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच ऑफिस टेबल ही देण्यात आला.
या प्रसंगी शिक्षक ईश्वर इंगळे आणि जनार्दन पाजळे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचे व दरेकर परिवाराचे विशेष आभार मानले.
त्यांनी सांगितले की हे साहित्य शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावी करण्यास मोठी मदत करणार आहे.

साहित्य वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पालकांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले.
अशा सामाजिक कार्यामुळे ग्रामीण शिक्षणाला चालना मिळते, तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाला थेट फायदा होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!