Uncategorized
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे व संजय राऊत यांना सदिच्छा भेट*
मुंबई,

दिवाळीच्या सणानिमित्त राज्यातील विविध नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड आणि मुंबई समन्वयक गणेश चौधरी यांनी आज मुंबईत दोन प्रमुख राजकीय नेत्यांची भेट घेतली.
या भेटीत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी समाजकारण, मराठा समाजाची एकजूट, तसेच राज्याच्या विकासासंबंधी विविध विषयांवर थोडक्यात चर्चा झाली. “राजकीय मतभेदांपलीकडे समाजातील ऐक्य आणि प्रगती हाच आमचा उद्देश आहे,” असे डॉ. मोजाड यांनी सांगितले.



