Uncategorized

दीपांच्या प्रकाशात रंगली ‘दीपसंध्या’ — युनिमॉन्ट ओरोम सोसायटी, दहीवली येथे अजय दिघे यांच्या विद्यमाने भव्य आयोजन

कर्जत, रायगड: संकेत घेवारे

दिवाळीचा उत्साह, संगीताची मैफील आणि दीपांच्या प्रकाशाने उजळलेली संध्याकाळ असा बहारदार माहोल युनिमॉन्ट ओरोम सोसायटी, दहीवली येथे अनुभवायला मिळाला. अजय दिघे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपसंध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्सवाची रंगत शिगेला पोहोचली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. मा. नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते. त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करत सांगितले की, “दिवाळी हा आनंद आणि ऐक्याचा सण आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ होते.”

संध्येची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. नंतर संगीताच्या दुनियेत प्रेक्षकांना घेऊन गेले सप्तसुर एक स्वरोगीण गायक तेजस महाडिक आणि गायिका मिनल लोभी. त्यांच्या गाण्यांनी इमारत परिसरात टाळ्यांचा कडकडाट घडवला. जुन्या मराठी भक्ती गीत आणि हिंदी गीतांची लयलूट रंगली, तर काही भावस्पर्शी गाण्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोराडे यांनी अत्यंत मनमोहक पद्धतीने केले. त्यांच्या जिवंत निवेदनाने संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

संगीत संयोजनात कीबोर्डवर प्रतिक वैते, लॅक्रोपॅडवर नितेश दुईकर, मुदुगवर आमोल बैलमारे आणि तबल्यावर रूपेश करक यांनी आपल्या वादनकलेने कार्यक्रमाला ऊर्जा दिली. संगीत आणि गाण्यांच्या तालावर उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांनी नाचत जल्लोष केला.

दीपांच्या झगमगाटात सजवलेले सभागृह आणि फुलांच्या सजावटीने नटलेले मंच पाहून प्रेक्षक भारावून गेले. सोसायटीतील रहिवासी कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद लुटला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी नाचगाण्याचा आणि प्रकाशोत्सवाचा मनमुराद फटाके वाजवत आनंद घेतला.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयोजक समिती, तांत्रिक सहाय्यक आणि स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. शेवटी सर्व उपस्थितांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत मेजवानी चा आनंद घेतला आणि दीपसंध्येचा आनंद द्विगुणित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!