Uncategorized

विश्वशांती बुद्धविहार कुडे येथे केशव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण विभाग अध्यक्ष संतोष जाधव यांनी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे अठरावे पुष्प गुंफले

 बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा तळा व बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व उपशाखा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने मु.कुडे विश्वशांती बुद्धविहार ता.तळा या ठिकाणी वार रविवार ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ :३० वाजता वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे अठरावे पुष्पाचे आयोजन केशव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व कुडे ऐक्यवर्धक ग्रामस्थ व मुंबई मंडळ तसेच माता रमाई महिला मंडळ यांच्या सहकार्याने गुंफण्यात आले.

वर्षावास धम्मप्रवचनाचे सुत्रपठण तळा तालुका कोषाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, केशव लोखंडे, विशाखा शिंदे यांनी केले. तद्नंतर आलेल्या मान्यवरांचे कुडे ग्रामस्थ व मुंबई मंडळाने गुलाबपुष्प देऊन स्वागत केले,या कार्यक्रमाच्या प्रसंगी बौध्दजन पंचायत समिती तालुका तळा अध्यक्ष अनंत मोरे ,भारतीय बौध्दमहासभा तालुका तळा अध्यक्ष रामदास शिंदे यांनी वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या,या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेसाठी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय बौद्धमहासभा रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष संतोष जाधव यांनी धम्म संस्थेने ठरवून दिलेला विषय स्त्रियांचे उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर धम्मप्रवचन दिले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी मताचा अधिकार मिळवून दिला,स्त्री पुरुष विषमता यामधील दरी मिटवली,गरोदरपनात ६ महिने भरपगारी राजा असे कित्येक अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिले आहेत त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच खरे स्त्रियांचे मुक्तिदाते व उद्धारकर्ते आहेत असे जाधव यांनी सांगितले.

या प्रसंगी तळा तालुका भारतीय बौद्धमहासभा सरचिटणीस गणपत जगताप,संरक्षण उपाध्यक्ष मनोहर शिंदे,बौध्दजन पंचायत समिती तालुका तळा सरचिटणीस सचिन गवाणे, कोशाध्यक्ष पांडुरंग गवाणे, नाना जगताप, संदेश पवार, विठ्ठल जगताप,संदीप जगताप,महादेव जगताप,मधुकर नाक्ते,भास्कर माळी,महादेव गवाणे,यशवंत जाधव,तळा तालुका महिला कोशाध्यक्षा अनिशा जगताप, महिमा जसवलकर, सुमन सकपाळ,वैशाली नाक्ते,मीना नाक्ते,इत्यादी पुरुष व महिला विभाग पदाधिकारी व धम्म उपासक उपासिका उपस्थित होते, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश लोखंडे,अनंत लोखंडे,राम लोखंडे व संपूर्ण स्थानिक व मुंबई मंडळ,माता रमाई महिला मंडळ यांनी हातभार लावला,विशेष करून या वर्षावास कार्यक्रमासाठी रत्नमाला जाधव,रायगड जिल्हा संघटक सूर्यकांत तांबे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी मनोहर शिंदे,विश्वजित नाक्ते,श्रेया नाक्ते,पांडुरंग लोखंडे या समता सैनिक दलाचे जवान यांनी सुरक्षा दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनंत लोखंडे यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे राम लोखंडे यांनी केले व अध्यक्षीय मनोगत केशव लोखंडे यांनी केले तसेच अनंत लोखंडे यांच्यावतीने आलेल्या धम्म उपासक यांना भोजनदान देण्यात आले व तद्नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!