Uncategorized

……” तांबाटी येथील सेन्टोजन एक्सपोर्ट लि. कंपनीचे कामगार आक्रमक “…

कामगारांची " फसवणूक " केल्याने कंपनी व्यवस्थापनाचा केला निषेध ! 

न्याय न मिळाल्यास ” आमरण उपोषण ” करून ” आत्मदहनाचा ” दिला इशारा.…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – ऐन तरुणपणात कंपनी बंद झाल्याने मुलांचे शिक्षण , आरोग्य , व कुटुंबाची ” वाताहात ” होऊन कामगारांना ” देशोधडीस ” लावून लेबर कोर्टात न्यायाच्या प्रतिक्षेत १७ वर्षे घालवूनही न्याय न मिळाल्याने अखेर खालापूर तालुक्यातील तांबाटी येथील ” सेन्टोजन एक्सपोर्ट लि. कंपनी ” चे कामगार आक्रमक होत कंपनीच्या गेटवर एकत्रित येऊन कामगारांची फसवणूक केल्याने कंपनी व्यवस्थापनाचा जोरदार घोषणा देऊन तीव्र संताप व्यक्त करत ” निषेध ” नोंदवला , तर आम्हाला न्याय न मिळाल्यास भविष्यात आम्ही आमच्या कुटुंबासमवेत ” आमरण उपोषण ” करून ” आत्मदहनाचा ” इशारा कंपनीत कायम स्वरुपी असणारे सर्व स्थानिक भूमिपुत्र ३२ कामगारांनी दिला .

सन १९९३ साली खालापूर तालुक्यात तांबाटी ग्रामपंचायतर हद्दीत ” सेन्टोजन एक्सपोर्ट लि. कंपनी ” सुरू झाली असता येथील स्थानिक भूमिपुत्रांनी इमाने इतबारे कमी वेतनात काम केले . कंपनी व्यवस्थित सुरू असताना कामगारांना विश्वासात न घेता सन २००८ साली कंपनी अचानक कामगारांना कुठलीही नोटीस न देता बंद करण्यात आली . कंपनीत १५ वर्षे काम करून तरुण वयात असलेले ३५ ते ४० वयातील कामगारांना त्यावेळी देशोधडीस लावण्यात आले. सर्वांना केलेल्या कामाचा मोबदला मिळावा , अशी कामगारांची मागणी असताना कंपनी व्यवस्थापनाने दंडेलशाही वापरून कामगारांना लेबर कोर्टात जाणे भाग पाडले . या दरम्यान कंपनीचा भंगार विकणे , जागा विकणे , असे कटकारस्थान कंपनी करत असताना कामगारांनी जोरदार विरोध करून त्यांच्यावर पोलीस केसेस करण्यात आल्या . १५ वर्षे लेबर कोर्टाने निकाल दिला नसून काही कामगारांना कंपनीने सन २०२४ साली तुम्हाला तुमचा हिशोब देण्याच्या बहाण्याने ” तुटपुंजी रक्कम ” देत कामगारांचा विरोध मोडकळीस आणला . मात्र अनेक कामगारांना त्यांच्या न्याय हक्काचे व कामगार कायद्यानुसार पैशाचा हिशोब न मिळाल्याने हा लढा आता ३२ भूमिपुत्र कामगारांनी तीव्र करत कंपनीने कामगारांचा कायदयाप्रमाणे असणारा आजपर्यंतचा हिशोब द्यावा , अन्यथा आम्ही या गेटसमोर ” आमरण उपोषण ” व कुटुंबा समवेत ” आत्मदहन ” करू असा संतप्त इशारा कंपनी व्यवस्थापनेला दिला आहे.

कामगारांचा खटला कामगार न्यायालय ठाणे येथे चालू आहे , सदर कंपनीची जमीन कुणीही खरेदी करु नये , असा फलक देखील त्यांनी कंपनीच्या गेटवर लावला असल्याने न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या वयोवृद्ध कामगारांना न्याय कधी मिळणार ? या प्रतिक्षेत कामगारांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे . यावर आता सेन्टोजन एक्सपोर्ट लि. कंपनीचे व्यवस्थापन काय निर्णय घेते , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!