अहिल्यादेवी विकास ट्रस्ट कराड, वतीने सायली ढेबे यांना पुरस्कार प्रदान

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्ताने गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मा. कु. सायली बाळू ढेबे,मुळशी पुणे यांना देण्यात आला. त्यांचे सामाजिक क्षेत्र, कलाक्षेत्र, पत्रकारिता, तसेच शैक्षणिक क्षेत्रात बी. ए. इन सायकॉलॉजी पदवी प्राप्त, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन कम्प्युटर एप्लीकेशन तसेच आत्ता शिक्षण घेत असलेल्या फिजिओथेरपी क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेत हा पुरस्कार मा. श्री. प्रवीण काकडे ( संस्थापक अध्यक्ष, अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड) यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला.
या पुरस्कारा दरम्यान प्रमुख अतिथी लाभले होते. मा. डॉ. अशोक गुजर, मा. राजेंद्र अण्णासाहेब डांगे, मा. सचिन बुरुंगले तसेच मा. डॉ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते, श्री. उल्हास वाघमोडे, मा. श्री. विश्वासराव मोरे पाटील, श्री. डॉ. भरत बल्लाळ, मा. धोंडीराम जाधव, प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, प्रा. श्री. रवींद्र कोकरे, प्रा. साहेबराव चौरे ह्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.