Uncategorized

निराबाई काळुराम लोते यांचे अल्पशा आजाराने निधन.

खालापूर , दिपक जगताप खालापूर शहरात राहणारी वै.निराबाई काळुराम लोते यांचे शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.या वेळी त्या 78 वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता त्या सतत प्रयत्नशील असायच्या . ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि.16 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र पुंडलिक मंदिर साजगाव येथे होणार आहे.तसेच त्यांचे उत्तरकार्य रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी खालापूर येथे त्यांच्या निवास स्थानी होणार आहे. यावेळी रायगड भूषण ह.भ.प.भाई रामदास महाराज पाटील यांचे प्रवचन होणार आहे.

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा विनायक लोते, शरद लोते ,मुलगी संध्या रमाकांत भगत आणि पुतणे,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे , जावई, असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!