खालापूर न्यायालयात CJI बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

खालापूर (शिवाजी जाधव) — दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी खालापूर येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या भ्याड आणि निंदनीय हल्ल्याचा वकिल संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
या निषेध आंदोलनानंतर निवेदन माननीय न्यायाधीश श्रीमती देशमुख मॅडम तसेच तहसीलदार श्री अभय चव्हाण यांना देण्यात आले.
या प्रसंगी आपले मनोगत तीव्र शब्दांत व्यक्त करताना ॲड. संदेश धावरे आणि ॲड. नवनीत साळवी यांनी अशा घटना न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास ॲड. आनंद गायकवाड, ॲड. जे. डी. पाटील, ॲड. स्मिता पाटील, ॲड. संजय दराडे, ॲड. कृष्णा साळुखे, ॲड. किरण केदारी, ॲड. प्रदीप सुर्वे, ॲड. मयुर कांबळे, ॲड. अजयकुमार गौतम, ॲड. संदीप पवार तसेच खालापूर येथील अनेक वकिल वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.*आज दिनांक 8 / 10 / 2025 रोजी खालापुर येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारात माननीय न्यायमूर्ती CJI बी आर गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड निंदनीय हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला, सदर निषेदाचे निवेदन माननीय न्यायाधीश महोदया देशमुख मॅडम खालापूर तसेच माननीय तहसीलदार साहेब अभय चव्हाण साहेब खालापूर यांना देण्यात आले त्यावेळी आपले मनोगत तीव्र शब्दात ॲड .संदेश साहेबराव धावारे व ॲड .नवनीत साळवी यांनी व्यक्त केले .सदर घटनेचा जाहीर निषेध करतेवेळी ॲड . आनंद गायकवाड, ॲड . जे . डी . पाटील, ॲड . स्मिता पाटील, ॲड . संजय दराडे, ॲड कृष्णा साळुखे, ॲड . किरण केदारी, ॲड . प्रदिप सुर्वे ॲड . मयुर कांबळे , ॲड . अजय कुमार गौतम, ॲड . संदीप पवार . तसेच अनेक वकिल वर्ग खालापुर उपस्थित होते .