पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला आमदार महेंद्र थोरवे — कर्जत-खालापूर मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण
नवी मुंबई, बेधडक महाराष्ट्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य उदघाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. अनेक दिग्गज नेत्यांच्या आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण साक्षीला राहिला. विशेष म्हणजे, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे या सोहळ्यात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अतिमहत्वाच्या पाहुण्यांमध्ये सहभागी झाले होते. कर्जतपासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर असलेले हे विमानतळ भविष्यात या परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधींमुळे कर्जत-खालापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांचा सहभाग हा मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
राजकारण आणि समाजकारण या पलीकडे एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळख असलेल्या आमदार थोरवे यांच्या संपर्क व कार्यक्षमतेची झलक या प्रसंगी पुन्हा दिसली. पंतप्रधानांच्या स्वागताला थेट उपस्थित राहणाऱ्या थोरवे यांच्या या सहभागामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी असे उच्चस्तरीय संबंध आणि थेट संवाद हे निश्चितच सकारात्मक ठरणार आहेत.
कर्जत-खालापूर मतदारसंघाच्या जनतेसाठी हा क्षण केवळ अभिमानाचा नव्हे, तर आगामी प्रगतीचा दिशादर्शक ठरणार आहे.