तळा उर्दु शाळेचे पदवीधर शिक्षक लियाकत अब्दुल रहेमान राऊत आविष्कार फाउंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रविवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी अविष्कार फाउंडेशन तर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या तळा उर्दु शाळेचे पदवीधर शिक्षक लियाकत अब्दुल रहमान राऊत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लियाकत अब्दुल रहेमान राऊत यांनी शिक्षण क्षेत्रात प्रभारी मुख्याध्यापक, प्रभारी केंद्र प्रमुख आणि उर्दू माध्यमाच्या नियोजनासाठी पनवेल डायट मध्ये सक्रिय भरीव कामगिरी केली आहे. ते गेली अनेक वर्षे त्यांनी राज्यस्तरीय आरपी म्हणजेच मास्टर ट्रेनर या हुद्यावर एस सी आर टी सी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर म्हणून काम करत आहेत.
लियाकत अब्दुल रहेमान राऊत हे सन ११/ ११ / ९२ ला सेवेत रुजू झाले. ते सध्याची शाळा रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा तळा येथे मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक दोन्ही पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात गरीब गरजू मुलांना प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप व आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या फोंडेशन तर्फे मदत करणे व सामाजिक क्षेत्रात गरीब गरजू लोकांना गरजेप्रमाणे मदत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ते सध्या महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना चे राज्य संघटक म्हणून काम करत आहेत. ते माणगाव तालुका मुस्लिम अमन फाउंडेशनचे सचिव पदावर काम करीत आहेत, तसेच रायगड फलाई मुस्लिम तंजींचे तालुका अध्यक्ष व इतर वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळे विद्यार्थी घडवून आणले आहेत. त्यांची तालुका श्रीवर्धन दिव्यागर येथे बारा वर्षे, तालुका श्रीवर्धन बोली येथे तीन वर्ष व तळा तालुक्यात आणि माणगाव तालुक्यात अशी एकूण अठरा वर्षे सेवा झाली असून या कालावधीत त्यांच्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनिअर वकील व शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत हे पाहून महाराष्ट्रातील अविष्कार फाउंडेशन यांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.