डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले महात्मा गांधींना जीवदान या विषयावर प्राध्यापक कानीफ भोसले यांचे प्रवचन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले महात्मा गांधींना जीवदान या विषयावर प्राध्यापक कानीफ भोसले यांचे प्रवच

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) पंचशील बौद्धजन सेवा संघ, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ८४१ आणि पंचशील महिला सेवा संघ गोरेगाव विभाग यांचे संयुक्त विद्यमाने तीन महिने दर सप्ताहात वर्षावास प्रवचन सुरू आहे. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, २०२५ पासून गांधी सप्ताह सुरू आहे. याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात राखीव मतदार संघाबाबत झालेल्या ऐतिहासिक पुणे करार या विषयावर व्याख्यान दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी पन्हळघर येथे आयोजित केले होते. यावेळी प्रमुख वक्ते वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक कानीफ भोसले सर यांना निमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य पूर्व गोलमेज परिषदेत दलितांकरिता स्वतंत्र मतदार संघ व संयुक्त मतदार राखीव ठेवण्याची मागणी केली. बॅरिस्टर महात्मा गांधी आणि बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब यांच्यात तात्विक वाद झाला. ब्रिटिशांनी तत्वतः मान्यता दिली होती. अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ या विरोधात मिस्टर करमचंद मोहनलाल गांधी यांनी अमरन उपोषण सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघ व संयुक्त मतदार संघ यांची मागणी करू नये म्हणून म.गांधींनी उपोषण केले. या उपोषणाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी सोडावी म्हणून अनेकाने प्रयत्न केले. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा जीव घेतला तरी मी माझ्या दलीत बांधवांचे हक्क सोडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक सनातनी भारतीयांनी जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. बाबासाहेब डगमगले नाही. गांधीजींची प्रकृती अत्यवस्थ झाली. स्वतंत्र मतदार संघ ऐवजी संयुक्त मतदार संघ घ्यायला सांगितले. महात्मा गांधींची पत्नी कस्तुरबा करमचंद गांधी यांनी डॉ. बाबासाहेब यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या डॉ. आंबेडकर तुम्ही माझे भाऊ आहात. माझे कुंकू वाचवा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण विचाराअंती संयुक्त मतदार संघ आरक्षण घेऊन या ऐतिहासिक पुणे करारावर स्वाक्षरी केली. या पुणे कराराची जागतिक पातळीवर ऐतिहासिक नोंद झाली. यावेळेपासून दलिताना राजकीय आरक्षण सुरू झाले. याबाबत वक्ते प्रा. कानीफ भोसले यांनी अनेक उदाहरण देऊन खुलासा केला. त्यांचे सोबत अभंग कांबळे, सखाराम गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकासदादा गायकवाड होते.
या प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष चंद्रमणी साळवी, महिला संघाच्या अध्यक्ष सुप्रिया साळवी, विश्वस्त सचीव संदीप साळवी,महिला उपसचिव संघमित्रा गायकवाड,उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला तुकाराम लोखंडे, रामदास जाधव, शरद मोरे, विजय मोरे, बळीराम हाटे, वडगाव, सुरेश जाधव, दिनेश तांबे, श्रीकांत साळवी, उपस्थित होते.पंचशील महिला संघाच्या , सौ. राखी मोरे, सौ. अपर्णा लोखंडे, प्रिया लोखंडे, श्रीम. जयश्री सोनवणे, रेश्मा संदीप साळवी, भारती साळवी,शीला वसंत मोरे, विद्या हिरामण महाडिक, छाया नामदेव शिंदे, सुशीला सुरेश शिंदे महिला उपस्थित होत्या. स्थानिक भावकीचे गीतेश जाधव, विशाल जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रदीप जाधव, सागर जाधव, प्रांजळ जाधव प्रितेश जाधव, माया प्रकाश जाधव, रंजना रामदास जाधव, चंद्रिका जनार्दन जाधव, कविता विजय जाधव इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा आयु. राजू मोरे, सर यांनी सामूहिक ग्रहण करून दिल्या. व्यवस्थापक मंडळाने धम्मदान दिले, अल्पोपहार व चहापान नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.