ग्रुप ग्राम पंचायत तांबाटी नवीन प्रशासकीय इमारतीचा गटविकास अधिकारी यांच्या हस्ते उदघाटन सोहळा संपन्न
खालापूर, सुधीर देशमुख

खालापूर तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून व विकास कामात तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असणारी ग्रामपंचायत म्हणून ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी कडे बघितले जाते 1992 साली अस्तित्वात आलेली ही ग्रामपंचायत त्यावेळी३.५०लाख वार्षिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत आज रोजी ५ कोटी वार्षिक उत्पन्न आहे. विभागात हळूहळू झपाट्याने वाढत गेलेली एन्डस्ट्री व मोठे मोठे उद्योग यांच्या CSR फंड व ग्राम निधीतून या ग्रामपंचायतीने विकास कामात आपला स्तर, आलेख चढता ठेवला. 1993 चे पहिले सरपंच श्री शरद कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या कामाचा व ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा आलेख सांगून समाधान व्यक्त केले. तांबाटी ग्रामपंचायतीच्या तीन मजली सुसज्य इमारतीचे, शेतकऱ्यांना शेतीचे अवजार बँक, रुग्णवाहिका यांचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांना न बोलवता प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उदघाटन करून एक चांगला संदेश देण्याचे काम ग्रामपंचायतीने केल्याबद्दल समाधान व्यक्त केले व प्रशंसा देखील केली. तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने असाच विकास करून एकमेकांत स्पर्धा करून अशी प्रगती करावी ,कमी उत्पन्नात पण विकास कामे करता येतात कामाच्या व विकासाच्या आधारावर ती ग्रामपंचायत श्रेष्ठ ठरते. ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच श्रीअविनाश आमले यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले कि प्रत्येक वेळेला आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व ठिकाणी स्तुती केली जाते तेव्हा ही स्तुती माझी एकट्याची नसून सर्व ग्रामस्थांची आहे. आज आम्ही ISO मानांकन पर्यंत पोहचलो आहोत स्पर्धेला आम्ही राज्यस्तरावर काम करतोय ,हे मी सरपंच झालो त्या दोन वर्षाची तपश्चर्या नसून 1993 पासून स्थापन झालेल्या ग्रामपंचायत मधील माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य,प्रशासकीय अधिकारी, व कर्मचारी यांची मेहनत आहे. म्हणून आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहे. ह्या मंगल प्रसंगी नवीन ग्रामपंचायत वास्तू विषयी सांगताना माजी सरपंच अनिल जाधव व उपसरपंच संदेश पाटील यांनी पाया रचला व आमच्या कालावधीत उपसरपंच नितीन कदम व सर्व सन्मानीय सदस्य मिळून कलश रचून ही वास्तू पूर्ण केली. असेच पुढील काळातही सर्वांनी मोलाचे सहकार्य करावे असे आव्हान उपस्थित सदस्य व ग्रामस्थांना सरपंच अविनाश आमले यांनी केले. ग्रामपंचायत अधिकारी श्री रप्रशांत कदम यांनी ह्या प्रसंगी थोडक्यात पण मुद्देसूद वर्णन या ग्रामपंचायतिचा आलेख कसा चढता आहे तो सांगितला. तीन मजली प्रशास्त अशी इमारत का बांधावी लागली, तर जशी लोकसंख्या वाढते, कुटुंब संख्या वाढते तशी दिवसेंदिवस ग्रामपंचायतिच्या दप्तराचा भार वाढत रंगेला व जागा कमी पडत गेली 2020 ते 2025 ह्या त्यांच्या कालावधीत ग्रामसेवक म्हणून तांबाटी यंग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार प्राप्त केले. माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत कोकणात प्रथम क्रमांक व राज्यात 7 वा क्रमांक व बक्षीस 50 लाख ( 2024),राष्ट्र संत तुकडोजि महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा रायगड जिल्हा यंहप्रथम पुरस्कार व 6 लाख रुपये मिळाले. शासन मान्य सौस्थेकडून ISO मानांकन तालुक्यातील प्रथम ISO ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त अशा प्रकारे एकूण 8 पुरस्कार ग्रामपंचायतीला व ग्रामविकास अधिकारी म्हणून वैयक्तिक 11 पुरस्कार ज्यामध्ये रायगड जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त करून तालुक्यात व जिल्यात ग्रामपंचायती चे नाव राखले ,ह्या सर्वांचे श्रेय हे त्यांनी आपल्या बरोबर काम केलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी, विस्तार अधिकारी विभागातील जनता व मुख्य म्हणजे ग्रामपंचायती चे कर्मचारी त्या सर्वांचा हातभार ह्या पुरस्कार प्राप्त करण्यात आहे. ह्या प्रसंगी कार्यक्रमात खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संदीप कराड, विस्तार अधिकारी शेलेंद्र तांडेल, अनिल जाधव शाखा अभियंता बांधकाम विभाग, अल्पना जाधव बांधकाम अभियंता, गोदरेज कंपनीचे CSR व्यवस्थापक श्री तानाजी चव्हाण, MNS कंपनीचे व्यवस्थापक श्री किरण वैद्य, टाटा कंपनीचे CSR व्यवस्थापक श्री भावेश रावळ, माजी सरपंच शरद कदम, अनिल जाधव, माजी उपसरपंच संदेश पाटील, सुरेश बलकवडे, होनाड चे सरपंच प्रकाश पाटील, शिरवलीचे सरपंच महेश पाटील, वडवळ चे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, नारंगी चे सरपंच सौं भारती आरावकर, माजी ग्रामसेवक प्रमोद पाटील, प्रशांत खांडेकर, गणेश मोरे, यांच्या सह तांबाटी ग्रामपंचायत चे सरपंच अविनाश आमले, उपसरपंच नितीन कदम, सदस्य सौं शितल पाटील, रितेश मोरे, हरिभाऊ जाधव, सौ सुगंधा जाधव, सौ प्राजक्ता पाटील,सौ अरुणा सावंत, सुरेश पवार, सौअस्मिता कदम, संतोष दळवी, श्रीम.कविता मिरकुटे यांच्या सह माजी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.