नवकार (प्रिती)CFS यार्ड येथील ट्रेलर मुळे प्रचंड वाहतूक कोंडी ; भर रस्त्यावर शेकडो ट्रक
पत्रकारिता करताना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महिला पत्रकारांचा पुढाकार व संघर्ष ...

पनवेल/अजीवली (साबीर शेख):- आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अटकलेलं पाहिले असता न्यूज केंद्र संपादिका प्रेरणा गावंड, पत्रकार रोहिता साळुंखे व पत्रकार साबीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली . अजीवली गाव लगत मुख्य महामार्गावरील नवकार (प्रिती)CFS यार्ड मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला 30 मिनिटे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली होती. प्रिती यार्ड पासून ते मुख्य महामार्ग पर्यंत ट्रेलरच्या मोठ्या रांगा होत्या आता येण्यासाठी जागा नसताना यार्ड ने आपल्या सोयीनुसार पर्याप्त जागा नसताना हि नेहमी प्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त ट्रेलर मागवलेले होते. शेंडूग फाटा ते यार्ड आणि दुसऱ्या बाजूने तशीच ट्रक रांग ट्राफिक प्रति यार्ड च्या मुख्य प्रवेशा पासून दूतर्गती महामार्ग उड्डाण पुला पर्यंत पोहचलेली होती. दोन्ही बाजूने झालेल्या वाहतूक कोंडी शेकडो वाहने अटकून संताप व्यक्त करत होते . आणि सांगत होते की नवी मुंबई विमानतळ चालू होण्याअगोदर वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन करावे . यावेळी मात्र वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कुठल्याही प्रकारे कोणीही व्यक्ती ,व्यवस्था त्या ठिकाणी नसल्याने पत्रकार वर्गानी स्वतः त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी धाव घेतली . सदर अडचणीची बाब वाहतूक नियंत्रण कक्षाला हि कळविण्यात आली. त्या वाहतूक कोंडी ठिकाणची सत्यता बातमीच्या साठी वृत्त संकलन करताना महिला पत्रकार वर्गाने प्रयत्न केले असता त्या ठिकाणी एक गृहस्थ आपली नाराजी व्यक्त करीत आला .थोडया वेळाने त्या ठिकाणी काही स्थानिक हि हातात लाकडी बांबू घेऊन वाहतूक सोडवताना दिसले त्यानंतर तेच नागरिक हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान करून स्वतःला आम्ही येथील सुरक्षा कर्मचारी आहे असे बोलू लागले आणि कश्याला आमच्या कंपनीची शुटिंग करता मी पण तुमची करेल असे म्हणून महिला पत्रकार यांच्या वृत्त संकलनाच्या कामात अडथळा निर्माण करू लागले. या सर्व घटनेची माहिती त्यावेळी उपस्थित असलेले ट्राफिक नियंत्रण कक्ष अधिकारी वर्गाने वरिष्ठांना सांगितली त्यावेळी तेथील गृहस्थाने वाहतूक नियंत्रण कक्ष पोलीस अधिकाऱ्याला घ्या तुमच्या साहेबांशी बोला असे म्हणत कोण्या निवृत्त अधिकारी व्यक्तीशी बोलून काही काळ त्याठिकाणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलीसांनी त्या व्यक्तीला योग्य ती समज दिली आणि त्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी यांना बोलावले .काही वेळाने आलेल्या महिला पोलीस अधिकारी यांनी सदर घटनेची चौकशी करून नवकार (प्रिती)CFS यार्ड मधील अधिकारी जैन यांना हा काय प्रकार आहे तुम्ही घटनास्थळी या असे सांगितले . अधिकारी जैन याने मी येतो असे म्हणून पोलीस व पत्रकारांना कोण निवारा चौकीत खूप वेळ थांबवले व तो आला नाही , त्याना अनेक वेळा केलेला पोलीस महिला अधिकारी यांचा एक हि कॉल त्याने स्वीकारला नाही .या सर्व प्रकारा बाबतीत वाहतूक नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली असता चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे महिला पत्रकारांना सांगण्यात आले.
नियमबाह्य पध्दतीने CFS यार्ड चालवणाऱ्या लॉजीस्टिकचे परवाने रद्द व्हावे आणि बेकायदेशीर वाहतूक कोंडी करणाऱ्या ट्रक चालक व कथित सुरक्षा कर्मचारी ,गाव गुंडांवर कारवाई व्हावी व पत्रकार सुरक्षा कायद्या नुसार पत्रकारांना न्याय द्यावे असे पत्रकार प्रेरणा गावंड व रोहिता साळुंखे यांनी सांगितले