…..” स्थलांतरित झालेल्या बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेत अनेक समस्या “…
सावळा गोंधळामुळे खातेधारक व बँक अधिकारी वर्गात तू तू - मैं मैं !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – कर्जत नगर परिषद हद्दीतील महावीर पेठ परिसरात पूर्वीच्या जुन्या जागेत बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेत ” संशयास्पद शॉक सर्किट ” मुळे आग लागल्याने आता रेल्वे स्टेशन समोर दुबे मेन्शन येथे स्थलांतरित झालेल्या बँकेत अनेक ” समस्या ” असल्याने दोनच दिवसांत खातेधारकांना व पेन्शन धारकांना योग्य सोइ – सुविधा उपलब्ध होत नसल्याने खातेधारक व बँक कर्मचारी वर्गात ” तू तू – मैं मैं ” घडत असल्याने बँक ऑफ इंडिया शाखेचा ” सावळा गोंधळ ” सर्वांसमोर आला आहे . ज्येष्ठांना आपल्या पेन्शन साठी ताटकळत व खाली बसावे लागत असल्याने कर्जत मध्ये या बँकेच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे .
बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेत गेली अनेक वर्षे राज्य व केंद्रीय निवृत्त शासकीय कर्मचारी , मयत कर्मचारी यांच्या विधवा महिलांना पेन्शन , शासकीय योजनेच्या पेन्शन योजनेचा लाभ या बँकेतून होत आहे . पूर्वी तळ मजल्यावर असलेली बँक आता दुबे मेन्शन इमारतीत पहिल्या माळ्यावर हि बँक सुरू झाली आहे . वयोवृद्ध महिला व ज्येष्ठांना पहिल्या मजल्यावर जाण्यास लिफ्टची व्यवस्था आहे , पण ती लिफ्ट बंद – चालू करण्याची माहिती त्यांना नाही , तर लिफ्ट इतकी छोटी आहे की एका वेळी फक्त ३ ते ४ जण जाऊ शकतात , पर्यायी व्यवस्था म्हणजे एकूण २५ पायऱ्या त्यांना चढून वर जावे लागणार असल्याने त्यांची ” दमछाक ” होताना दिसत आहे . त्यातच महिलांना बँकेत बसण्यास कुठलीच व्यवस्था केली नसल्याने जास्तीच्या संख्येने आलेले खाते धारक आज तर चक्क ” खाली ” बसलेले दिसण्यात आले . बँकेत जाण्याच्या गेट जवळ गाडी पार्किंग साठी देखील जागा नसल्याने भविष्यात भर बाजार पेठेत गाड्या पार्किंग होऊन ” वाहतुकीची कोंडी ” होणार आहे .
तर येथील कॉम्प्युटर सिस्टिम बी एस एन एल ची नेट सेवा बंद अवस्थेत होती , तर तुम्ही कडाव किंवा जांभिवली बँक शाखेत जा , येथील नेट सेवा बंद आहे तर , असे सांगितल्याने एक महिला खातेदार व बँकेचे कर्मचारी विनायक गीडगी यांच्यात वादावाद झाली , बँक मॅनेजर ही देखील जाग्यावर नव्हते . त्यामुळे बँकेचा हा ” सावळा गोंधळ ” खूप उशिरा पर्यंत सुरू होता . अनेक महिला , जेष्ठ नागरिक आज ०१ ऑक्टोंबर म्हणून पेन्शन घेण्यास आलेले असताना खाली लादी वर बसलेल्या अवस्थेत खूपच खेदजनक दृश्य पहाण्यास मिळत असल्याने , अनेकांनी बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेच्या अश्या ” ढोबळ कारभाराचा ” संताप व्यक्त केला .तर तातडीने येथील समस्या सोडवाव्या , अशी संतापजनक मागणी अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली .