Uncategorized
झोपडीत राहणारी ‘परी’, उद्धव ठाकरेंनी पूरबाधित गरिबाचं घर पाहिलं; चिमुकलीला जवळ घेऊन नाव विचारलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा करत आज लातूर, धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊन, बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांना धीर देत सरकारकडे मागणीही केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा करत आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊन, बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांना धीर देत सरकारकडे मागणीही केली.
धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील ईटकुर येथील महिलेच्या घरात पावसाचं पाणी शिरलं होतं, उद्धव ठाकरे ईटकूर गावात नुकसानग्रस्त शेती आणि शेतकऱ्यांच्या घरातील पूरस्थिती पाहणी करायला आले होते.
कळंब तालुक्यातील इटकूर गावातील शिलाताई मोरे ह्यांच्या घरात पाणी शिरले होते, त्या घराची पाहणी उद्धव ठाकरे ह्यांनी केली. यावेळी, घरातील चिमकुल्या मुलीला जवळ घेत उद्धव ठाकरेंनी तिचं नाव विचारलं, तेव्हा तिने परी नाव सांगताच व्वा… म्हणत संवाद साधला.