Uncategorized

नेरळ मोहाची वाडी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश; जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

कर्जत (प्रतिनिधी) :
नेरळ परिसरातील मोहाची वाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी ११ मार्च २०२६ रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला.यावेळी नेरळ मोहाची वाडी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. समाजकारण व विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.या पक्षप्रवेशावेळी दिनेश राठोड (भाऊ), ऋषिकेश आटाव, प्रांजली देशमुख, किरण गळिम, बीबी मोरे, अमित आटाव, योगेश गुलाब, अभिषेक वाघमारे, रोहित आबून, चंद्रशेखर साळवी, प्रतीक हिलम, रुमिक हिलम, कुणाल नत्रजे, अजय शिंदे, शोएब, महेश वाघमारे, राजा शिनारे, सागर धोके, कपिल तायडे, लक्ष्मण मिरकुटे, महेश शिनारे, प्रशांत जाधव, विशाल बाने, विनोद कातकरी, करण वाघमारे, वळवी, अजय, अशोक जाधव, हर्षद म्हागे, हरचंद्र अगिवले, अनंता कांबरी, स्वामील वळवी, प्रकाश मिरकुटे, शिवराम मिरकुटे, राजू मिरकुटे, अनिकेत हिलम, मनीष खारीर, अनिरुद्ध, शेष, संतोषी मिरकुटे, राजेका पाऊरे, आशा वळवी, आकारा हायलिंगे, प्रनिक कांगारे आदी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला भगवान चंचे (तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य नेरळ), सोमनाथ पालकर आणि स्वप्नील पालकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. आगामी काळात रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!