Uncategorized

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील स्टीलचे बॅरीकेट्स त्वरित हटविले नाही तर किशोर सांळुकेंचा उपोषणाचा ईशारा

खोपोली (सुजाता यादव)

वरिल रस्त्यालगत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील खो.न.पा. गाळ्या समोर स्टील चे बॅरीकेट्स वाहतुकीचा व सार्वजनिक कार्यक्रमास अडथळा ठरत असल्याने ते त्वरित हटविले नाही तर उपोषणाचा ईशारा बहुजन युथ पँथर चे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी दिला आहे. खोपोली नगर परिषद समाज मंदिर रोड

खोपोली नगर परिषद चे समाजमंदिर रोड वरिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर गाळे आहेत तेथुन भर रस्त्यामध्ये स्टील च बॅरीकेट्से लावण्यात आले आहेत. यामुळे रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्मारकासमोर होणाऱ्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमास, जयंती वगैरे कार्यक्रमास अडथळा होत आहे. मोठ्या सभा या ठिकाणी होत असतात. त्यास या बॅरीकेट्स मुळे अडथळा निर्माण होत आहे.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगोदर या ठिकाणचे हे स्टीलचे बॅरीकेट्स हटविले नाही तर खो.न.पा. समोर उपोषण करण्याचे पत्र खो.न.पा कार्यालयात दिले असून खो.न.पा. काय कारवाई करते याकडे सर्व खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!