आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवत भानुदास बोराडे व हालीवली शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
शिवसेना उपतालुकाप्रमुख सनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सनी चव्हाण यांनी संघटन बांधणीसाठी प्रभावी पावले उचलत पक्षाला नवसंजीवनी दिली आहे. पोसरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भानुदास बोराडे व हलवली ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
दिनांक १ रोजी पोसरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेणगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. हामिवाली ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते भानुदास बोराडे व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला.
हा पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार थोरवे यांनी भानुदास बोराडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेत हार्दिक स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भानुदास बोराडे हे हामिवाली व हलवली परिसरात सामाजिक कार्य, ग्रामविकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम सक्रिय असलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत. पूर्वीपासून घरगुती व जिव्हाळ्याचे संबंध असलेले सहकारी अशी त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते :
गुलाब संनल पवार, भानुदास बोराडे (माजी सरपंच), जयेश खाडे, सरपंच राजू बोराडे, पार्थ जाधव, अनिल खाडे, गौरव बोराडे, प्रकाश जाधव, साहिल बोराडे, रुपेश म्हस्कर, रोहित मणेर, मयूर खाडे, निलेश मणेर, ऋषिकेश बेडकर, सचिन पालकर, चेतन बोराडे, गणेश बोराडे, विक्रांत जाधव, निकेश बोराडे, अंकुश मरगळे, महेश बोराडे, निवेश कालकर, मनोज बडेकर, निशांत बोराडे, राकेश बोराडे, भावेश मणेर, दिगंबर बोराडे, श्रवण बोराडे, तेजस बोराडे, यशवंत म्हसे, अनिल शिंदे, तेजस हांडे, पंकज बोराडे, चैतन्य हांडे, मनोज हांडे, प्रक्कुल बोराडे, गौरिकेश बोराडे, दिनेश बोराडे, भरत श्रीखंडे, विजय कनोजे, नितीन ठाणगे, प्रकाश बोराडे, महेश जाधव, अक्षय बोराई, अविनाश बोराई, संतोष ह. बोराडे, निमेश बोराडे, पप्पू पवार, गुरुनाथ वाघमारे, अरुण पवार, अजय वाघमारे, निरज पवार, रामदास पवार तसेच गुलाब अनंत पवार (माजी सरपंच) आदींचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात असून, हामिवाली व हलवली परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर अधिक बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कार्यक्रमा वेळी आमदार महेंद्र थोरवे, मनोहर थोरवे भाई गायकर, संकेत भासे, अमर मिसाळ, प्रसाद थोरवे, अरुण देशमुख, शिवराम बदे,संतोष फराट सनी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.




