ई रिक्षात वाढ करावी स्थानिक नागरिकांनची जनसुनावणीत मागणी

दिगंबर चंदने/माथेरान 
दिनांक ६ऑगस्ट २०२५रोजी माननीय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी माथेरानच्या हात रीक्षा अमानवीय स्वरूपाचे असल्याने नमुद करून माथेरान मधील हात रिक्षा चालकांना ई रिक्षा द्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश सहा महिन्यात निर्णय घेऊन द्यावेत असे आपल्या आदेशात म्हटले आहे आहे
याच पार्श्वभूमीवर सह नियंत्रण समितीने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी माथेरान येथे जन सुनावणी आयोजित केली होती यावेळी माथेरानच्या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी ई रिक्षा ची संख्या 100 च्या आसपास असावी अशी मागणी केली सध्या वीस ई रीक्षाचे पायलेट प्रोजेक्ट सुरू आहे दिवसा या रिक्षा विद्यार्थ्यांना सेवा देतात त्यामुळे पर्यटक व स्थानिकांना ई रिक्षासाठी तासनतास पहावी लागते माथेरान येथे ब्रिटिश काळापासून वाहन बंदी आहे घोडा व हात रिक्षा यांना परवांगी आहे परंतू हात रिक्षा ही अमानवीय स्वरूपाची प्रथा बंद करून तो त्वरित बंद करून हात रिक्षा चालकांना अंतर्गत वाहतुकीसाठी ई रिक्षा द्याव्यात यावर सहा महिन्यात राज्य शासनाने निर्णय घेण्याचे आदेश देखील न्यायालयाकडून देण्यात आले परंतू निष्क्रिय स्थानिक प्रशासनाकडून सहा महीने पुर्ण होत आले तरी अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याने स्थानिक प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पर्यटकांना हक्काची व स्वस्तातील अशी वाहतूक सुरू झाली आहे मात्र या ई रीक्षांची संख्या वाढ होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत विविध स्थानिक संस्थांनी व्यक्त केले
जनसुनावणी वेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अनंता शेलार व चंद्रकांत जाधव यांनी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घरापर्यंत ई रीक्षाची सेवा तसेच लोकाभिमुख सेवा देण्याची मागणी केली संवेदनशील नागरिक प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मनोज खेडकर यांनी ई रीक्षा पर्यावरण पूरक असल्यामुळे संख्येत वाढ करण्याची मागणी केली , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी यांच्या सह योगेश जाधव भास्कर शिंदे यांनी देखील ई रिक्षाची संख्या वाढवण्याची मागणी केलीआहे. येथील व्यवसाय हा पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून असल्याने ई रिक्षा ची सुविधा अंत्यत महत्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले माथेरान हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी राहुल मुनोत यांनी देखील इलेक्शनची संख्या 100 पर्यंत वाढवावी अशी मागणी केली ई रिक्षा सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे परंतु संख्या कमी असल्याने त्यांना तासनतास वाट पहावी लागते माथेरानच्या महिलांच्या निदेखील ही रिक्षा वाढीसाठी निवेदन दिले सेंट झेवियर्स शाळेच्या मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सिस्टर प्रिया यांनी सांगितले की सध्या ई रिक्षा कमी असल्याने एका रीक्षात आठ ते दहा विद्यार्थी कोंबून नेले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उपस्थित होतो तरी त्वरित ई रिक्षात वाढविण्याची मागणी त्यांनी केली
वन ट्री हिल विभागातील रहिवाशी तसेच माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, कुमुद साळवी, नगरसेवक किशोर मोरे यांनी वन ट्री ही विभागातील रहिवाशांना ही रिक्षा ची सेवा मिळावी अशी मागणी केली शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पूढे पन्नास कुटुंब राहतात.
श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे अध्यक्ष शकील पटेल प्रकाश सुतार रुपेश गायकवाड शुभम गायकवाड यांनी सर्व ९४हात रिक्षा चालकांना ही रिक्षा देण्याची मागणी केली प्रकाश सुतार कोर्टाच्या आदेशाचे तात्काळ अंमलबजावणी करून ही उर्वरित ७४ई रिक्षा सुरू करण्याची मागणी केली माथेरान प्रेस क्लब चे अध्यक्ष संजय भोसले व दिनेश सुतार यांनी देखील रिक्षाची संख्या वाढवण्याची मागणी केली सुनावणीच्या वेळी नगराध्य चंद्रकांत चौधरी, उपनगराध्य संतोष शेलार व मुख्याधिकारी राहुल इंगळे उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील ठळक मुद्दे
हात विषयाची ही अमान्य प्रथा सहा महिन्यात पूर्णतः माथेरान येथे बंद करण्यात यावे
ई रिक्षा चालकांना राज्य सरकारने स्वतः खरेदी करून भाडेतत्त्वावर देण्यात याव्या यासाठी त्यांनी गुजरातच्या केवड्या येथे प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे
राज्य सरकार तर्फे जो हात रीक्षा चालकांचा अहवाल कोर्टात सादर.केला आहे त्या अहवालात त्रुटी असल्याचे मत रिक्षा संघटनेचे ज्येष्ठ वकील कॉलीन गोंसालवीस यांनी व्यक्त केले. हात रीक्षा ओढल्याने चालकांवर श्वसनाचे गंभीर आजार होतात



