डोंबिवली टिळक रस्ता सिमेंट काँक्रिटिकरण लवकरच सुरू होणार…!


डोंबिवली-सुभाष पटनाईक.
गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवलीतील टिळक रोडचे काँक्रिटीकरण विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले आहे. विविध शासकीय यंत्रणाकडून त्यावर काम चालू आहे.अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम, पाणी पुरवठा मुख्य जलवाहिनी इत्यादी कामांमुळे हा रस्ता अनेक दिवस रखडलेला असून,सदर रस्त्यावर दुरुस्ती कामे करण्यास मानव निर्मित अडचणी निर्माण झाल्या होत्या.
काल पुन्हा एकदा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेबांना ह्या अडचणी बाबत सांगितले,असता त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंत्या अनिता परदेशी मॅडम ह्यांच्याशी चर्चा केली व त्या नुसार गुरुवारी सदर रस्त्याच्या कामाचा व त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी एकत्रित पाहणी दौरा पार पडला. लवकरच ह्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत असून, उर्वरित अर्धा रस्ता लाकरात-लवकर वाहतुकीसाठी डागडुजी करून,देणे बाबत अनिता परदेशी मॅडम मार्फत संबंधितांना आदेशित करण्यात आले. व ज्यांच्यामुळे ह्या कामास विलंब झाला.त्यांना नोटीस देण्यात येणार आहे.
ह्या पाहणी दौऱ्यात कडोंमापा अधिकारी, एमएमआरडीए अधिकारी त्यावर काम करणाऱ्या यंत्रणा, वाहतूक पोलिस अधिकरी श्रीराम पाटील आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना शहर प्रमुख सागर जेधे, संजय निकते हे उपस्थित होते.




