वंदे मातरम् 150 व्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला – भारतीयह्रदयसम्राट सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांची मालवणी मालाड मुंबई येथे उपस्थिती
मुंबई

दि.07/11/2025 वार शुक्रवार रोजी भारत देशाच्या ,वंदे मातरम् ला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सदर अमृत महोत्सव कार्यक्रम हा मालवणी मालाड (प.) मुंबई महाराष्ट्र राज्य येथे संपन्न झाला त्या सदर कार्यक्रम सोहळ्याला मालाड विधानसभा मतदारसंघाचे अगदी थोड्या मताने पराभूत झालेले उमेदवार तथा भाजपा चे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते तथा मुंबई सचिव मा.श्री. विनोदजी शेलार साहेब यांनी हा सदर कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला भारतीय नवनिर्माण लहुजी सेना सलग्न,, भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेना,, संस्थापक अध्यक्ष तथा, भारतीय पिडीत नागरिकांचे कैवारी मातंग समाजाचे निस्वार्थी लोक प्रिय लोक नेते, संघर्ष योध्दा, समाजसेवक, समाजसुधारक समाजभूषण लहुजीरत्न व इतर अनेक पुरस्कार प्राप्त कर्ते, भारतीयह्रदयसम्राटसेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांना सदर वंदे मातरम् कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असता व तसेच एक भारतीय नागरिक म्हणून एक समाज सेवकाला अपेक्षित असते की ज्या ज्या वेळी देश भक्ती गीते कार्यक्रम व तसेच ज्या ज्या वेळी देश हीताचे कार्यक्रम सोहोळे केली जातात त्या त्या वेळी प्रत्येक भारतीय नागरीकांनी देश भक्ती कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली पाहिजे मग तो पक्ष किंवा संघटना किंवा संस्था असेल त्याचा विचार न करता त्या त्या कार्यक्रमात सहभागी होऊन तो देशभक्तीचा आनंद मत्स्व साजरा केलाच… पाहिजे असे मत सेनाप्रमुख मोतेवाड यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. सदर कार्यक्रम सोहळा हा भाजपचे नेते मा.विनोदजी शेलार साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असून त्या सोहळ्याला भारतीय नवनिर्माण लहुजी सेना या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड सह मालवणी मालाड मुंबई व इतर परिसरातून अलेले अनेक कार्यकर्ते ही सहभागी झालेले होते त्या दरम्यान स्वाता सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांनी खरी देशभक्ती काय असते आणि देश हित काय असते त्या करीता एक नेता म्हणून नाही तर एक भारतीय नागरिक भारतीय देशभक्त म्हणून सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड साहेब यांनी स्वता हातात तिरंगा ध्वज घेऊन वंदे मातरम् या ना-याचा जय घोष करीत आनंद मत्स्व साजरा केला त्या दरम्यान मोतेवाड यांच्या सोबत मा. शकील शेख देखील उपस्थित होते कारण भारतीयह्रदयसम्राट सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांनी भारतीय पिडीत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय पिडीत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक शपथ घेतली की, मी जगेन तर देशासाठी आणि देशातल्या अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी!.. मी मरेन तर देशासाठी आणि देशातल्या अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी!.. आणि ही शपथ घेऊन मातंग समाजासह भारत देशातील विविध समुहातील पिडीत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करीत राहीन असे मत व्यक्त केले जात आहे आणि देश हिताच्या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहून आनंद उत्साह साजरा करीत राहीन असे मत भारतीयह्रदयसम्राट सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांच्या कडून व्यक्त केले जात आहे.सदर कार्यक्रम सोहळ्याला अनेक राजकीय नेते व भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली होती.




