Uncategorized

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे अंगणवाडी मधील कमी वजनाच्या बालकांची तपासणी 

छत्रपती संभाजीनगर न्यूज नेटवर्क जब्बार तडवी

सोयगाव दि.०६ – सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील अंगणवाडी मध्ये दि.०६ गुरूवारी सॅम (कमी वजनाच्या) बालकांची वजन व उंची मोजणी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी बालकांची गुरवारी तपासणी केली तर औषध निर्माता आकाश चावरे यांनी बालकांना औषधी वाटप केली. यावेळी उपस्थित बालकांच्या मातांना बालकांच्या आहार, स्तनपान व आरोग्यविषयक डॉ.चव्हाण यांच्याकडून समुपदेशन ही करण्यात आले. कमी वजनाच्या बालकांची तपासणी कार्यक्रम यशस्वितेसाठी अंगणवाडीच्या फर्दापूर सर्कल सुपरवायझर रिता लांडगे,हर्षा लक्ष्मण परदेशी ,मुनिरा कय्युम शेख,आशा रामदास पाटील,सुनिता विठ्ठल आगळे,इरफाना महेबुब शेख,सकू संताराम पानपाटील आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!