Uncategorized

सावळदबारा येथे उर्स यात्रा उत्सव व कुस्त्यांची दंगल कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सोयगाव न्यूज नेटवर्क जब्बार तडवी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे कार्तिक पूर्णिमेला उर्स यात्रा उत्सव तसेच कुस्त्यांची भव्य दंगल उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये दिग्गज मातब्बर पैलवानांच्या कुस्त्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या सावळदबारा येथे. साला बाद प्रमाणे शाली वस्ताद बाबा, आणि नागोबा महाराज यांची उर्स यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अनेक वर्षांपासून परंपरागत हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून सर्व जाती- धर्मांच्या समाज बांधव यांच्यातर्फे मिळून हा उत्सव आयोजित करण्यात येत असतो या महोत्सवा ला संध्याकाळी शाली वस्ताद बाबा यांच्या संदल ची गावा मध्ये मिरवणूक काढण्यात आली. तसेच सकाळी कार्तिक पूर्णिमाला गावामध्ये दिंडी सोहळा काढण्यात आला त्या नंतर दुपारी कुस्त्यांची भव्य दंगल आखाड्याला सुरुवात करण्यात आली या वेळेस आखाड्याची पूजा श्रीफळ फोडून डॉक्टर रामबली पांडे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख हे होते. आणि पहिली मानाची कुस्ती विजय होणाऱ्या पैलवान ला नागपूर येथील पोलीस खात्यातील स्पेशल फोर्स युनिट मधील पी.एस.आय.अमोल देशमुख यांच्या हस्ते इनाम देण्यात आला.

यावेळेस सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये हजेरी लावली असता त्यांचे स्वागत माजी सरपंच तथा आयोजक मोहम्मद लुकमान सेठ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शेवटच्या कुस्तीचा इनाम हा आमदार अब्दुल सत्तार यांच्यातर्फे ठेवण्यात आला होता शेवटची कुस्ती अंबड येथील पैलवान जयसिंग राजपूत आणि मोहोळ येथील संदीप पैलवान यांच्यामध्ये टक्कर झाली असता अंबड येथील जयसिंग राजपूत या पैलवानाने संदीप पैलवान यांना पराजित करून शेवटच्या कुस्ती वरती विजय मिळवला व जयसिंग पैलवान यांना विजय घोषित करून या आखाड्याचा मानकरी ठरला त्या पैलवानाचे फुलहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शेवटच्या कुस्तीचा इनाम जयसिंग राजपूत ला पुरस्कार.मोहम्मद लुकमान शेठ, डॉक्टर रामबली पांडे, दारासिंग चव्हाण, शिवाप्पा चोपडे, धरमसिंग चव्हाण, सरपंच मोहम्मद आरिफ. तालिब पैलवान,पंजाबराव देशमुख,मधुकर पुजारी, देवाप्पा पंधाडे, सुधाकर शिप्पलकर, रमेश देशमुख, प्रदीप चव्हाण, मनोज बुढाळ, गणेश खैरे, वसंत चोरमले, दिपक नप्ते, याची प्रमुख उपस्थिती होती तसेच या आयोजक मान्यवरांच्या हस्ते शेवट च्या कुस्ती चा इनाम पुरस्कार वाटप करण्यात आला आखड्याचे पंच म्हणून डॉक्टर जफर सय्यद, साबीर पैलवान, डॉक्टर विठ्ठल कोते, ईश्वर कोळपे, मोहम्मद सोहिल, यांनी काम पहिले होते. या कुस्त्यांच्या आखाड्याच्या बंदोबस्त साठी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी, पोलीस कर्मचारी शिवदास गोपाळ व इतर पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!