राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्जत-खालापूर भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे नेते राष्ट्रवादीत; अजय सावंत व पुष्पाताई दगडे उमेदवार जाहीर


कर्जत | प्रतिनिधी.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत-खालापूर आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा आज (दि. १३ नोव्हेंबर) रॉयल गार्डन, कर्जत येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. ना. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विविध राजकीय पक्षांतील मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली प्रवेश करून पक्षाला मोठी बळकटी दिली. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती श्री. पुंडलिक पाटील, शिवसेना शिंदे गटाचे कर्जत-खालापूर विधानसभा संघटक श्री. पंकज पुंडलिक पाटील, माजी नगरसेविका सौ. पुष्पा हरिश्चंद्र दगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव श्री. जे. पी. पाटील, युवा नेते श्री. दिनेश जाधव, माजी नगरसेवक श्री. चंद्रप्पा आनीवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. योगेश गायकवाड, धनगर समाज तालुका अध्यक्ष श्री. तुकाराम आखाडे, जेष्ठ कार्यकर्ते श्री. बाबू ढेबे, श्री. रामचंद्र ढेबे, श्री. अभिजीत राणे, श्री. राजेंद्र साखरे, माजी नगरसेवक श्री. मधुकर दळवी, माजी नगरसेविका मेघा वाडकर, चंद्रभागा आनीवार, तसेच शिवसेना शिंदे गट बीड विभाग संघटक श्री. मनोज बोडके, माथेरान महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. स्नेहा चव्हाण, खरीवली पंचायत समिती सहसंघटक श्री. सतीश मोरे, आणि युवासेना शाखाप्रमुख झाडाणी श्री. शंकर मोरे यांचा समावेश आहे.
या सर्व मान्यवरांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया आणखी मजबूत झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पक्षशक्ती निर्णायक ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणांविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस ही विकास, प्रामाणिकता आणि जनतेच्या विश्वासावर उभी असलेली पक्षसंस्था आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे आणि संघटनशक्ती वाढविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे.”
या कार्यक्रमात विविध पदांवर नवनियुक्त्या देण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करून त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर घारे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुनील पाटील, प्रदेश सरचिटणीस श्री. अशोक भोपतराव, जेष्ठ नेते श्री. दत्तात्रय मसुरकर, जिल्हा प्रमुख प्रवक्ते श्री. भरत (भाई) भगत, सरचिटणीस श्री. एकनाथ धुळे, कर्जत शहराध्यक्ष भगवान शेठ भोईर, कर्जत तालुका अध्यक्ष श्री. दीपक श्रीखंडे, खालापूर तालुका अध्यक्ष श्री. संतोष बैलमारे, जिल्हा युवक अध्यक्ष श्री. अंकित साखरे, तसेच कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माथेरान नगराध्यक्षपदासाठी श्री. अजय सावंत, तर कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सौ. पुष्पाताई दगडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.




