Uncategorized

कार्तिकी एकादशी निमित्ताने कुठल्याही प्रकारची पशु हत्या व मांस विक्री होऊ नये म्हणून खालापूर तहसीलदार यांना वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन..

खालापूर, दिपक जगताप

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आळंदी देवाची संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य व पर राज्यातून वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाज यांचा आळंदी इंद्रायणी तीरावरती महाकुंभ मेळा भरतो . तसेच विविध ठिकाणी ज्या वारकरी भाविकांना आळंदी येथे जाणे शक्य नसते ते वारकरी भाविक आपल्या गावात कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करत असतात.अशा ह्या पावन दिवशी कुठल्याही प्रकारची पशु हत्या व मांस विक्री होऊ नये यासाठी वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज खालापूर तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत मिलिंद तिऱ्हेकर नायब तहसीलदार, अशोक सुसलादे सहायक महसूल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील विविध भागातील हॉटेल व मांस विक्री व्यावसायिक यांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची पशु हत्या व व मांस विक्री करू नये अशी मागणी केली आहे. यावेळी रुपेश मेस्त्री कुलाबा जिल्हा समिती सदस्य वी हिं प, दिलीप पाटील खालापूर तालुका अध्यक्ष वी हिं प, रविंद्र जैन खालापूर तालुका उपाध्यक्ष वी हिं प, कैलास बारस्कर उपाध्यक्ष वी हिं प, कैलास लोखंडे खालापूर प्रखंडमंत्री वी हिं प, रोहित कुलकर्णी, करन जाधव, विनोद बारगजे, संतोष पाटील, सुधीर म्हात्रे, यशवंत नलावडे, लता लोते नगरसेविका, उज्ज्वला निधी नगरसेविका, सुप्रिया साळुंखे नगरसेविका, राजेश पारठे , उमेश गावंड माजी उपसभापती, ह भ प दत्तात्रय चाळके, ह भ प, उदय घोलप, ह भ प, पुंडलिक पाटील, ह भ प बबन जगताप, पुंडलिक लोते, मिलिंद पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!