Uncategorized

ब्रेनसेतू अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कर्जत मधील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

कर्जत (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वासात वाढ करण्याच्या उद्देशाने ब्रेनसेतू अकॅडमी तर्फे आयोजित शैक्षणिक सेमिनार उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ब्रेनसेतू अकॅडमीचे भव्य उद्घाटनही करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन रॉयल गार्डन, कर्जत येथे करण्यात आले होते.या प्रसंगी अनेक पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना ताणमुक्त शिक्षण, सर्जनशील विचार आणि स्मार्ट स्टडी तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

सेमिनारदरम्यान मेंदूची नैसर्गिक शिकण्याची क्षमता वाढवण्याचे उपाय, अभ्यास लक्षात ठेवण्याचे तंत्र, तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध खेळ आणि प्रयोग सादर करण्यात आले. उपस्थितांनी या सेमिनारचा मनःपूर्वक लाभ घेतला.या उपक्रमाबद्दल बोलताना आयोजक विरेंद्र जाधव, विजय मोहिते आणि महेश खडे यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी स्मरणशक्ती आणि एकाग्रता हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तसेच मेमरी किंग नरेंद्र सिंग यांनी या कार्यक्रमात अभ्यास करण्याच्या व लक्षात ठेवण्याच्या अशा काही सोप्या पद्धती सांगितल्या घ्या बघून पालक थक्क झाले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रेनसेतू अकॅडमी ही केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्व वयोगटांसाठी (४ ते ६० वर्षे) उपयुक्त प्रशिक्षण देणारी संस्था आह

.

अकॅडमीमध्ये मेमरी ट्रेनिंग, एकाग्रता वाढविणे, सार्वजनिक बोलणे, सर्जनशील विचार आणि स्मार्ट स्टडी हॅबिट्स यावर विशेष मार्गदर्शन दिले जाते. तसा तर ह्या अकॅडमी मध्ये प्रवेश हवा असल्यास ह्या ॲकॅडमीची फी २०,००० रुपये आहे परंतु कर्जतकरांसाठी सवलत म्हणून फक्त आणि फक्त ५९९९ रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे.तरी आपण सर्वानी जास्तीत जास्त आपल्या मुलांना ह्या अकॅडमी मध्ये पाठवून या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान अकॅडमीचे संचालक वीरेंद्र जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!