Uncategorized

विकास प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर द्या ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सूचना

अंबरनाथ मधील विकास प्रकल्पांचा केला पाहणी दौरा

अंबरनाथ/सुभाष पटनाईक  शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, अंबरनाथ नाट्यगृह,समाज मंदिर या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या विकास कामांची पाहणी करून कामाला गती देण्याचे आदेश दिले.

साई सेक्शन विभागातील अटल सूर्योदय उद्यानाचा लवकरच विकास करण्यात येणार आहे. या उद्यानाची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. नागरिकांनी उद्यान विकासाबाबत संवाद साधला. तर नागरिकनांच्या सूचनेनुसार आणि मैदानाचा निश्चित विकास होईल,असा विश्वास व्यक्त केला. तर अंबरनाथ साठी आजवर भरीव निधीची तरतूद केली असल्याचेही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.शहरातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण,शिक्षण,आरोग्य, धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक प्रकल्प खासदार डॉ.शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत.याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील अंबरनाथ येथे विविध विकास प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. याच विकास कामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेऊन मंदिर सुशोभीकरण प्रकल्पाची पाहणी केली.

अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या आणि सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या शिवमंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीतून ”शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प” राबविण्यात येत आहे. याप्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार,संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प काळ्या पाषाणात केला जाणार असून, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र,प्रवेशद्वारसमोरील चौकात नंदी,संरक्षक भिंत,चेक डॅम,भक्त निवास आणि भव्य घाट यांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील भव्य घाट उभारणीचे काम जलदगतीने सुरु आहे. यामुळे भविष्यात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना काशी, वाराणसी प्रमाणेच घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्ण होत आले आहे. तसेच भक्तनिवासाचे काम सुरु झाले आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदान येथे ३८.७१ कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त असे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच या नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाट्यगृहाची पाहणी करून अखेरच्या टप्प्यातील कामे पूर्ण करून नाट्यगृह नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना केल्या. 

अंबरनाथ पूर्वेतील साई सेक्शन परिसरात अटल सूर्योदय उद्यान आहे. अनेक ज्येष्ठ नागरीक, शालेय विद्यार्थी, माता – भगिनी आपल्या कुटुंबियांसोबत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून याचा विकास करण्यात येणार आहे. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी उद्यान विकासाबाबत संवाद साधला आणि नागरिकांच्या इच्छेनुसार तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना अनुसरून उद्यानाचा निश्चित विकास करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!