Uncategorized

सुधाकर घारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

रायगड

कर्जत,पाथरज (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, तसेच मा. उपाध्यक्ष व सभापती रायगड जिल्हा परिषद सुधाकर घारे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरज विभागाच्या वतीने गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्‌घाटन सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवसाचा सामाजिक उपक्रमातून साजरा करताना त्यांना मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम माझ्यासाठी बहुमूल्य आणि अमूल्य भेट आहे,” असे घारे यांनी नमूद केले.

या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पाथरज विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक श्री. सचिनजी गडकरी यांनी विशेष सहकार्य केले.

या प्रसंगी उत्तर रायगड कार्याध्यक्ष श्री. अशोकशेठ भोपतराव, माजी समाजकल्याण सभापती (राजिप) श्री. नारायणजी डामसे, कर्जत तालुका अध्यक्ष श्री. दीपकजी श्रीखंडे, कर्जत शहर अध्यक्ष श्री. भगवानजी भोईर, ज्येष्ठ नेते श्री. नरेशजी जोशी, श्री. प्रमोद माळी, श्री. मोहनदादा माळी, श्री. रमेश दळवी, श्री. हरेश घुडे, श्री. छगन कोकणे, श्री. भुषण पेमारे, श्री. अरुण हरपूडे, श्री. मोहन धुळे, श्री. कमलाकर रसाळ, श्री. संतोष निलधे, श्री. सुजित लोहकरे, श्री. जयराम हरपूडे, श्रीमती रंजनाताई धुळे, सौ. नमिता घारे, जयवंती हिंदोळा, सुचिता लोहकरे, सुरेखा हरपूडे, रुपाली क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!