स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या घडामोडींना आला वेग
छत्रपती संभाजीनगर न्यूज नेटवर्क जब्बार तडवी1

जेऊर सर्कल (तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जमाती राखीव महिला म्हणून जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर वडनेर येथील यशोदाबाई लक्ष्मण पवार यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या संदर्भात वडनेर गावात ग्रामस्थांतर्फे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते यशोदाबाई पवार( वडनेर )यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी सुदाम बाबू राठोड, गावाचे सरपंच मूलचंद पवार, माजी सरपंच व माजी सैनिक राजू राठोड, चेअरमन वाल्मीक चव्हाण, राजाराम राठोड, वामन चव्हाण, गुलचंद चव्हाण, विजय मल्लू राठोड, नामदेव चव्हाण रामनाथ राठोड , चांदभाई, रुस्तुम पवार, रमेश गांगुर्डे, अशोक गायकवाड मच्छिंद्र गायकवाड पिंटू शिरोळे भिकन गांगुर्डे लक्ष्मण उबाळे तसेच इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्वांनी यशोदाबाई पवार यांच्या उमेदवारीसाठी एकदिलाने पाठराखण करण्याचा निर्धार केला. या निर्णयामुळे वडनेर गावात निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




