सरपंच सोमनाथ ओझरडे यांचा विकास गोगावले यांना खुले आव्हान..

महाड, निलेश लोखंडे
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विन्हेरे करंजाडी मतदार संघात 100% काटे की टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या मतदारसंघात मंत्र्यांचा मुलगा उमेदवार म्हणून रिंगणात उतरू शकतो अशी माहिती आज समोर आली आहे. स्थानिक नेतृत्वाने या पार्श्वभूमीवर आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे समोर कोणताही विरोधक असो आम्ही त्याला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघात जर विकास गोगावले निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो त्यांनी इथे येऊन लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यावा आम्ही जनतेच्या कौलचा आदर करू मात्र या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे आणि ती आमच्या पाठीशी ठाम उभी आहे मी गेली चार वर्ष या मतदारसंघात ग्राउंड लेव्हलवर काम केलं आहे या मतदारसंघातील प्रत्येक गाव प्रत्येक घरात मी पोहोचलो आहे आई झोलाई देवी जर्नी देवी आणि जाग माता देवीचा आशीर्वाद आमच्यावर आहे त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित मानतो
स्थानिक पातळीवर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे मंत्र्यांचा मुलगा खरंच उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का आणि त्यावर जनतेची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे