शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर पदाधिकाऱ्यांकडून दीपावली निमित्त सदिच्छा — डॉ. चंद्रकांत मोजाड

मुंबई, बेधडक महाराष्ट्र:शिवसेना नेते, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, पक्षाचे मुख्य प्रवक्ते, पुणे जिल्हा संपर्क नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दीपावली पाडवा निमित्त विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी राऊत यांना नववर्ष व दीपोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना पक्षातील एकजूट आणि आत्मीयतेचे दर्शन घडले.या भेटीत महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष व शिवसेना संपर्क प्रमुख (आंबेगाव-जुन्नर) दिलीप ब्राम्हणे, पिंपरी-चिंचवड जिल्हा समन्वयक केसरीनाथ पाटील, महाराष्ट्र वितरक सेनेचे सदस्य व मराठा क्रांती स्वराज्य संघटना मुंबई समन्वयक गणेश चौधरी, नगरसेवक अनिल पाटणकर, युवा सैनिक कुणाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी खासदार राऊत यांना भेटून पक्षाच्या धोरणांबाबत संवाद साधला व महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांच्या लढ्याचे कौतुक केले.
पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी खासदार राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांचे परखड आणि निर्भीड नेतृत्व कायम राहावे, अशी शुभेच्छा दिली. “सत्य आणि जनतेच्या हितासाठी राऊत यांचा आवाज नेहमी बुलंद राहिला पाहिजे,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मराठा क्रांती स्वराज्य संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष, उद्योजक व विकासक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील व्हॉइस ऑफ मीडिया व मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही खासदार राऊत यांना नववर्ष व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील परखड आवाज आहेत. पत्रकारितेतून आणि राजकारणातून त्यांनी सदैव सत्याचा पुरस्कार केला आहे.”
या भेटीत शिवसेनेच्या कार्यपद्धती, जनतेशी संवाद आणि पक्षाच्या पुढील नियोजनावरही चर्चा झाली. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या भेटीमुळे खऱ्या अर्थाने दीपावलीचा उत्साह वाढला.




