…..” शेअर मार्केटचे ज्ञान घेऊन येत आहे अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी “…
तरुणांना व मोठ्यांना करिअरसाठी सुवर्ण संधी !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – आजच्या युगात लोकं ऑनलाइन गेम्स आणि जुगारामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही गमावत आहेत. पण नक्की यश कशात आहे , आपले करिअर कश्याने घडू शकते हे माहीत नसल्याने नवीन पिढीला यशस्वी होण्याचा खरा मार्ग दाखविण्यासाठी ” शिकणे – समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन आत्मसात करणे ” म्हणून शेअर मार्केटचे ज्ञान घेऊन येत आहे , ” अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी ” गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 5 वाजता हनुमान मंदिर उक्रूळ, कर्जत रायगड
अंकूरण या प्रकल्पाच्या माध्यमातून. या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये करिअर घडवू शकतो.
आपल्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत अवधूत साठे सर , खास लोकआग्रहास्तव . चला, थोडा चेंज करूया , मनातला विचार बदलू या आणि फायनान्शियल फ्रीडम कडे वाटचाल करूया , यासाठी खास
तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी ही संधी गमावू नका.
चला शिकूया, वाढूया आणि स्वतःचं भविष्य घडवूया. म्हणून या उपयुक्त कार्यक्रमास सर्वांनी सहभागी होऊन जीवनात यशस्वी होण्याचे गणित समजून घ्या , असे आवाहन अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमीचे सर्वेसर्वा अवधूत साठे सर यांनी केले आहे .