Uncategorized

संकेत भासे ह्यांच्या पाठपुराव्याने शहरात अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर

संधी हुकली तरी नाही आराम – त्याच जोशाने पुन्हा सुरु काम!

कर्जत, बेधडक महाराष्ट्र  कर्जत शहरात विकासाचा नवा चेहरा म्हणून ओळखले जाणारे संकेत भासे पुन्हा एकदा शहराच्या प्रगतीसाठी मैदानात उतरले आहेत. नगराध्यक्ष पद आरक्षण प्रक्रियेमुळे त्यांना मागे रहावं लागलं असलं, तरी त्यांच्या विकासाभिमुख वृत्तीमध्ये कोणताही खंड पडलेली नाही. “राजकारणात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण शहराचा विकास मात्र आपल्या हातात आहे,” असे म्हणत संकेत भासे पुन्हा त्याच जोशाने कार्यरत झाले आहेत.

अलीकडेच शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून स्पीड ब्रेकरची मागणी होत होती. या मागणीची दखल घेत संकेत भासे यांनी कर्जत नगरपालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे भरधाव वाहनांना वेगावर नियंत्रण ठेवावे लागणार असून, नागरिकांची सुरक्षितताही अधिक बळकट होणार आहे.


संकेत भासे यांच्या कार्यशैलीत सातत्य, दृष्टीकोन आणि नागरिकांशी थेट संवाद या गोष्टी नेहमीच दिसून आल्या आहेत. नगराध्यक्ष पदाची संधी न मिळाल्याने त्यांनी निराशा न मानता, शहरासाठी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. कर्जतच्या विकासाचा आराखडा तयार करताना त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांना गती दिली आहे.

कर्जतच्या नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन काम करणारा हा तरुण चेहरा आज पुन्हा एकदा शहराच्या उन्नतीसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळेच “संधी हुकली तरी नाही आराम – त्याच जोशाने पुन्हा सुरु काम!” हे वाक्य संकेत भासे यांच्या कार्यप्रेमाचे प्रतीक ठरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!