Uncategorized

राष्ट्रीय मराठा समाज लोकनेते सदानंदराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली देशभर मराठा क्रांती स्वराज्य संघटना झंझावात अद्वितीय – प्रदीपभाई मोरे

बडोदे : बेधडक महाराष्ट्र
१४ फेब्रुवारी २०२२ रोजी बडोदे येथे राजे गायकवाड परिवारात देशातील अनेक राज्यात प्रादेशिक स्तरावर समाज कार्य करणाऱ्या निवडक सहकाऱ्यांना घेवून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मराठा क्रांती स्वराज्य संघटना या पक्षविरहीत राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. गेल्या तीन वर्षांच्या अल्पावधी कालखंडात ही संघटना ११ राज्यात खेडोपाडी पोहोचली. हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्लीच्या तख्तावर देखील समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तन मन धन अर्पण करून समाजासाठी सामाजिक कार्य सुरू केले आहे. देशभर खेडोपाडी संघटनेचा झंझावात सुरू असुन सर्वत्र डंका वाजत आहे. याचा अभिमान वाटतो. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक सदस्य व राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
भारत सरकार मान्यता प्राप्त, बारा बलुतेदार व अठरा पगड जाती सामील होत मराठा क्रांती स्वराज्य संघटना घोड दौड देशभर सुरू झाली शिवरायांचा आदर्श ठेवत संघटनेतर्फे गेल्या तीन वर्षांत अनेक राज्यात संघटनेची कार्यालये सुरु झाली. तीन रुग्णवाहिका सध्या महाराष्ट्रात धावत आहेत. चौथी रुग्णवाहिका लवकरच कोकण प्रदेश करिता देण्याचा मानस आहे. मुंबई, पनवेल तसेच सोलापुर येथे रुग्णसेवा सुरू असुन शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, ग्रामीण भागात शेतकरी मेळावे घेऊन हजारो नारळ, चिकू, आंबा आदी शेतकऱ्यांना उपयुक्त वृक्ष वाटप करण्यात आले. दैनिक बेधडक महाराष्ट्र कार्यकारी संपादक सदानंदराव भोसले यांच्या मराठा आरक्षण अग्रलेखाने सातारा सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.काही संघटनांनी सातारा जिल्हा कार्यालयाबाहेर आमरण उपोषण तर काही जण साखळी उपोषणास बसले होते.देशभर करोडो वाचकांनी या अग्रलेखाचे समर्थन केले होते.शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, छत्री वाटप, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, बडोदे , महाड, खेड येथे पूरग्रस्त भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली तर अनेक राज्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरे, घेवून अनेक राज्यात दहावी बारावी यशस्वी विद्यार्थांचा कौतुक सोहळा, समाजातील ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा पुणे, अहिल्या नगर शिर्डी येथे हजारो वधू वराचा सूचक मेळावा समाजातील नामांकित उद्योग, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात , उलवे येथे गेल्या तीन वर्षांत संघटनेकडून लाखो जनसुदाय उपस्थितीत सांस्कृतिक भव्य कोकण महोत्सव साजरा करण्यात आला या सह सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधव यांचा सन्मान सोहळे सातत्याने सुरू असुन खेड तालुक्यातील साईधाम बिजघर, बडोदे, सुरत, इंदोर, मुंबई येथे हजारो बांधवांच्या उपस्थितीत भव्य सभा घेण्यात आल्या.सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २०२६ वर्षाची आकर्षक, सुबक, दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येणार आहे. गेली तीन वर्षे सातत्याने हजारो दिनदर्शिका प्रकाशित केल्या जातात व देशभर खेडोपाडी समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय कार्याध्यक्ष उद्योजक गजाननराव साळुंखे राष्ट्रीय सल्लागार निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अरविंद महापदी, मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा.सौ.संध्या राणे, राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाश चव्हाण, मुंबई प्रदेश समन्वयक गणेश चौधरी गुजरात राज्य अध्यक्ष राजुभाई शेवाळे गुजरात युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते सरचिटणीस पांडुरंग मोरे दक्षिण गुजरात अध्यक्ष ॲड विराज सुर्वे उद्योजक अजय तिडके समाजनेते बडोदे येथील उद्योजक व विठ्ठल रुक्माई चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष किरण उद्योग समुहाचे चेअरमन दीपक जाधव बडोद्याचे युवा अध्यक्ष करण पवार राज्य महिला अध्यक्षा सौ कल्पना सुर्वे, नगर जिल्हा अध्यक्ष वसंतदादा मल्टी स्टेट बँकेचे संचालक दीपकराव धट पाटील रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांच्या सह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते संघटना वाढीसाठी मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!