Uncategorized

ओबीसी प्रवर्गातून निनाद वाजे लढणार खोपोली नगरपरिषदेची निवडणूक

सामाजिक कार्यातून लोकांचा विश्वास संपादन, वॉर्ड क्रमांक १४ मध्ये उमेदवारीची जोरदार चर्चा

खोपोली प्रतिनिधी –
खोपोली नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १४ मधून ओबीसी प्रवर्गातून निनाद वाजे यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सामाजिक कार्य, सार्वजनिक उपक्रम आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे निनाद वाजे यांनी स्थानिक पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

निनाद वाजे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. प्रत्येक सण, उत्सव, आपत्ती वा सार्वजनिक कामाच्या वेळी ते नेहमीच पुढे असतात. विशेषतः नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून, तरुणांसाठी खेळ, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे यांचे आयोजन करून समाजातील तरुणाईला एकत्र आणले आहे.

त्यांच्या पुढाकाराने वॉर्डात अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, तसेच दिवाळी-दसरा सारख्या सणांनिमित्त गरजूंना मदत असे विविध उपक्रम त्यांच्या पुढाकाराने राबवले जातात.

स्थानिक नागरिक सांगतात की, “निनाद वाजे हे नेहमी आमच्या गरजांवेळी धावून येतात. कोणत्याही कामासाठी फोन केला की लगेच प्रतिसाद देतात. समाजातील सर्व घटकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.”

निनाद वाजे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक बनले आहे. वॉर्ड क्रमांक १४ मधील तरुण वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. अनेक नागरिक आणि मित्रमंडळींनी त्यांना निवडणुकीत उतरावे असा आग्रह धरला आहे.

वाजे म्हणाले, “मी गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात आहे. लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. जर जनता आणि कार्यकर्ते इच्छुक असतील, तर मी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्यास तयार आहे.”

निनाद वाजे यांनी सदैव जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, युवकांसाठी रोजगार निर्मिती, तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधा यावर त्यांनी अनेकदा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
तसेच गणेशोत्सव, शिवजयंती, स्वातंत्र्यदिन अशा प्रसंगीही त्यांनी तरुणांना एकत्र करून समाजातील एकात्मता वाढविण्याचे काम केले आहे.

खोपोलीतील अनेक नागरिकांचे मत आहे की, “निनाद वाजे यांसारखे कार्यकर्ते राजकारणात आले तर वॉर्डातील अनेक प्रलंबित प्रश्न सुटतील. कारण ते फक्त बोलत नाहीत, तर कृती करून दाखवतात.”

सध्या वॉर्ड क्रमांक १४ मध्ये विविध राजकीय पक्षांचे हालचाली सुरू असून, ओबीसी प्रवर्गातील ही जागा महत्त्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर निनाद वाजे यांच्या नावाची चर्चा अधिक जोम धरत आहे. त्यांच्या समाजसेवेचा आणि प्रामाणिक कार्याचा अनुभव लक्षात घेता नागरिक त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाहण्यास उत्सुक आहेत.

आगामी काळात निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यावर निनाद वाजे अधिकृतपणे रिंगणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र इतकं नक्की की, निनाद वाजे यांच्या उमेदवारीच्या चर्चेने वॉर्ड क्रमांक १४ मध्ये राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!