Uncategorized
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत फौजी आंबवडे येथे स्वच्छतेची रॅली
लोकांचा वाढता सहभाग आमच्यासाठी प्रेरणादायी – सरपंच सचिन पवार

महाड, रायगड : निलेश लोखंडे : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने आज महाड तालुक्यातील प्रसिद्ध फौजी आंबवडे गावात स्वच्छतेची रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग पाहता वातावरण उत्साहवर्धक बनले होते.
सरपंच सचिन जयराम पवार यांनी सांगितले की, “फौजी आंबवडे हे गाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात ओळखले जाते. मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात आमच्या गावाचा सहभाग ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामस्थांचा वाढता सहभाग आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
या रॅलीत ग्रामसेवक प्रशांत भुरे, पोलीस पाटील श्रीमती वंदना पवार, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका-मदतनिस, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, तसेच गावातील महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
.