मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष महेंद्र भोसले वाढ दिवसानिमित्त अभिष्टचिंतन,जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी उपस्थित – महेशराव मोरे

खेड (बेधडक महाराष्ट्र) — मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष महेंद्र भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली. ही बैठक रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांच्या भरणे नाका येथील कार्यालयात संपन्न झाली.
कार्यक्रमात जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन महेंद्र भोसले यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, राज्य युवा अध्यक्ष शुभम गायकवाड, तालुका अध्यक्ष श्रीराम कदम आणि तालुका सचिव दीपक यादव यांनी मार्गदर्शन केले.
महेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक जोमाने सुरू असून, कोकणातील मराठा समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी लढा देण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या
.