महाड येथे महिलांकरिता आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.
महाड, निलेश लोखंडे

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी मा. गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील मॅडम यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती ( प्रेरिका, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी, CTC, प्रभागसंघ व्यवस्थापक व तालुका कक्षातील कार्यालयीन महिला कर्मचारी यांचे करिता तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका कक्ष, महाड व तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग महाड यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये समुदाय संसाधन व्यक्तींनी वैद्यकीय तपासणीसह विविध आरोग्य सेवा घेतल्या. या उपक्रमामुळे समुदाय स्तरीय संस्था मध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागणेस मदत होईल.
याच दिवशी “माझ्या स्वप्नातील ग्रामसंघ” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी समुदाय संसाधन व्यक्तीनी आपल्या प्रेरणादायी कल्पना सादर करत ग्रामसंघाच्या विकासावरील व उमेदच्या प्रभावी अंमलबजावनीच्या अनुषंगाने आपले दृष्टिकोन मांडले._
कामाच्या व्यापातून थोडसा विसावा मिळावा, करमणूक व्हावी याकरिता नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. विविध पारंपरिक वेशभूषा, नृत्य संगीतानी सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले._
या संपूर्ण कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे मा. गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील मॅडम यांची प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद परभणी येथे झालेल्या पदोन्नतीबद्दल आयोजीत अभिनंदन समारंभ. उपस्थित सर्व तालुका कक्षातील अधिकारी, कर्मचारी, समुदाय संसाधन व्यक्ती यांनी मॅडमचा गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._
_या नावीन्य उपक्रमांमुळे समुदायात नवी ऊर्जा, एकता व विकासाचा विश्वास निर्माण झाला आहे. उमेदच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल ठरले._
तालुका अभियान व्यवस्थापक श्री. संचित पार्टे, विस्तार अधिकारी श्रीम. चिनके मॅडम, तालुका सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. निलेश मोरे, आरोग्य विभागाची टीम, उमेद कक्षातील सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करुन एक उत्तम नावीन्य उपक्रम राबविले बद्दल सर्वत्र कौतुकास्पद चर्चा दिसून आली._