माहितीच्या अधिकारात अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ, कर्जतमधील सहाय्यक निबंध सहकारी संस्थेचा अजब कारभार!
कर्जत: जयेश जाधव

कर्जत नगरपरिषद हद्दीतील गुंडगे येथील रहिवासी संतोष साबळे यांनी सहायक निबंध सहकारी संस्था कर्जत त्यांच्याकडे मातेश्वरी हील पार्क सहकारी गृहनिर्माण सोसायटीची माहिती अधिकारात अर्ज दाखल करून माहिती मागवली असताना ती देण्यास नकार दिला म्हणून अर्जदार संतोष साबळे यांनी याच कार्यालयात जन माहिती अधिकारी तथा सहकारी अधिकारी सहाय्यक निबंध सहकारी संस्था व चेअरमन सेक्रेटरी मातेश्वरी हिल पार्क सहकारी गृहनिर्माण सोसायटी गुंडगे यांच्याविरुद्ध प्रथम अपील सहाय्यक निबंध सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केले.
सदर दाखल करण्यात आलेल्या अपील अर्जावर सुनावणी घेण्यात आली अपीलकर्ता संतोष साबळे यांचे सुनावणी आदेश अंशतः मान्य करण्यात आला असून संस्थेने अपीलकर्ता संतोष साबळे यांना दिनांक 31.1.2025 चे अर्जाद्वारे मागवलेली माहिती दहा दिवसांत विनाशुल्क देण्यात यावी अशा आदेशाचे पत्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी कटकदौंड यांनी त्याचे स्वाक्षरीने दिनांक ३/४/२०२५ रोजी काढले होते आजातागायत सहा महिने होऊन देखील अपीलकर्ता संतोष साबळे यांना माहिती दिली नाही.माहिती अधिकारात माहिती देणे हे बंधनकारक आहे असे असताना देखील सहकारी अधिकारी (श्रेणी २) सुनील दांगट हे यांनी माहिती दडवून ठेवली असून माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.तसेच अपिल सुनावणी होऊन निकालपत्रात माहिती देण्याचे लेखी आदेश दिले असून देखील त्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी अर्जदार संतोष साबळे यांनी मातेश्वरी हिल्स पार्क सोसायटी याबाबत झालेला भ्रष्टाचार संदर्भात सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक या वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी दाखल केलेल्या असून या अर्जाची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांना लेखी आदेशाचे पत्र विभागीय निबंध सहकारी संस्था कोकण विभाग मिलिंद भालेराव यांनी दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक प्र.का. जगताप यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (6) अंतर्गत प्राप्तअधिकारानुसार मातेश्वरी पार्क सहकारी गृहनिर्माण या या सोसायटीची सन 2018- 24 या या कालावधीची संस्थेची संपूर्ण फेर लेखापरीक्षण करणे कामी करण्याची लेखी आदेश काढून संस्थेने फेर लेखा परिक्षण दोन महिन्याच्या आत पूर्ण करून अहवाल अर्जदार सहकारी निबंधक सहकारी संस्था कर्जतच्या कार्यालयात सादर करावा असे आदेशाची पत्र दिनांक १७/१२/२०२४ रोजी काढले आहेत मात्र आजपर्यंत त्या आदेशाची कुठल्याही प्रकारे पालन केले नाही याचा पुरावा अर्जदार संतोष साबळे पत्रकारांजवळ दिला आहे. गुंडगे येथील मातेश्वर हिल्स पार्क सहकारी गृहनिर्माण सोसायटीत झालेल्या भ्रष्टाचाराला व गैरव्यवराला सहाय्यक निबंध सहकारी संस्थेचे अधिकारी पाठीशी घालत असून यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होऊन भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी अर्जदार संतोष साबळे यांनी उघड केले आहे तरी या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.