
कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील भर बाजारात बेकायदेशीर फटाके स्टाॅल मांडलेले आहे.याकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे
नियमा विरोधात व विनापरवाना एक एक ठिकाणी आठ ते दहा स्टॉल लागलेले आहे याला कुठलीही रीतसर परवानगी न घेता देणारे दूकानदाराने पोलिस आणि नगरपरिषद यांच्याशी आर्थिक हातमिळवणी करून प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे फटाके सारखे (स्फोटक) पदार्थांचे स्टाॅल रस्त्यावर मांडलेले आहे.
सतत शासनाच्या नियमांची पायामल्ली फटाका व्यवसायिककडून सूरु आहे यांना ना हरकत प्रमाणपत्र स्थानिक पोलिस स्टेशनकडून देण्यात आले नाही अधिकारी याला कारणभूत असून यात नगरपरिषदेचे अधिकारी दोषी आहे. दिवाळी फटाका स्टॉल लावण्याचे नियम शासनाने ठरवून दिलेले आहे फटाका स्टॉल हे रहदारी पासून दूर पाहिजे रोड लगत हे स्टॉल लावण्यात येऊ नये तसेच स्टॉल चेहरे एकमेकांना मधील अंतर ठरवलेले आहे असे या विभागात ठरत नाही नियमाची पायमल्ली फटाका व्यवसाईका कडून होत आहे यात जिल्हाधिकारी यांच्या कडून फटाका व्यवसाईकांना परवानगी घेताना काही नियम ठरवून दिलेले असतात यात स्टॉल व्यवसायिकांनी फटाका विक्रीच्या ठिकाणी वाळू, पाणी, फायर सिस्टम ठेवणे बंधनकारक असतांनाही या व्यवसाईका कडून नियमाचे राजरोसपणे उल्लंघन होतांना दिसत आहे तसेच किती डेसीबल फटाके स्टॉलवर विक्री करावे यांचे नियम असतांना पाच ते दहा हजारी मोठे फटाका तसेच चायनिज फटाका विक्री, मोठ्या आवाजाही फटाका विक्री, तडतडी, मोठ्या आवाजाही अॅटम बॉम विक्री प्रत्येक स्टॉल लावणारे विक्री करतांना दिसत आहे तसेच या बेकायदेशीर व्यवसाईकांना विद्युत पुरवठा अनाधिकृतपणे केला जातो.
कर्जत नगरपालिका हद्दीत भर बाजारात तसेच कर्जत पोलिस ठाणेच्या कमानीजवळच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला फटाका स्टॉल नियमा विरोधात आणि रोडवरचं भर वस्तीत कसे लागतात हे स्टॉल एकमेकांना चिटकून एकाच ठिकाणी आठ ते दहा स्टॉल नियमा विरोधात बेकायदेशीर कसे लागतात आणि यांना कर्जत स्थानिक पोलिस स्टेशन कडून नियमा विरोधात कुठलाही नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही तसेच नगरपरिषदेकडून यांना परवानगी दिल्या नाहीत आणि नियम डावलून यांना विद्युत पुरवठा कसा केला जातो हा एक संशोधनाचा विषय असून अर्थकारण करून नियमांची पायमल्ली करून यांना तोंडी परवानगी देणारे कोण आणि सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळणा-या अधिका-यावर कारवाई मागणी जनते कडून होत आहे .नियमा विरोधात कर्जत पोलिस ठाणेकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीर फटाके स्टाॅल मांडलेल्या व त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी जनते कडून होत आहे.




