कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश !
कर्जत, रायगड/ बेधडक महाराष्ट्र

कर्जतकरांना मिळणार नवीन क्रीडांगण आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा….
कर्जत शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक संपन्न झाली याच बैठकीत कर्जत शिवसेना परिवारात अनेक पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आल्या तसेच भिसेगाव परिसरातील कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेबांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले आणि
“निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात आपण एकत्र काम करून शिवसेना आणखी बळकट करू,” असा शब्द दिला. विजय हजारे हे आज पक्षात प्रवेश करत आहे हा शिवसेना कर्जत नगरपालिकेसाठी शुभ शकून आहे. आज कर्जत शहरात अनेक अशी विकासकामे आपण केलेले आहे ज्यामध्ये प्रति पंढरपूर आळंदी हे पर्यटकांसाठी लँडमार्क बनले आहे. समृद्ध कर्जत शहरासाठी आपण ५७ कोटींची पाणी योजना पूर्णत्वाला जात आहे कर्जत शहरातील नदी संवर्धन कार्य देखील पूर्ण होत आहे व येणाऱ्या भविष्यकाळात कर्जतकरांना नवीन क्रीडांगण देखील मिळणार आहे अशी घोषणा केली , तसेच ज्येष्ठ नेते व पत्रकार रमाकांत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..
या आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी विधानसभा संपर्कप्रमुख श्री पंकज पाटील, विधानसभा संघटक श्री शिवराम बदे , युवा सेना तालुका अध्यक्ष श्री अमर मिसाळ,कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ॲड संकेत भासे, ,कर्जत शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे, कर्जत शहर प्रमुख श्री संजय मोहिते, ज्येष्ठ नेते व पत्रकार श्री रमाकांत जाधव,शहर संघटक नदीम खान, शहर संपर्कप्रमुख सुदेश देवघरे, शहर अधिकारी सचिन भोईर , श्री महेंद्र निगुडकर ,शहर संपर्कप्रमुख अभिजीत मुधोळकर, कर्जत उपशहर प्रमुख श्री दिनेश कडू , तालुकाप्रमुख महिला आघाडी सौ रेश्मा ताई म्हात्रे, सौ सुरेखा शितोळे, सौ सायली शहासणे ,आदी मान्यवर व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते