Uncategorized

खरसुंडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विहिंप बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक यशवंत नलावडे व आत्माराम नलावडे यांच्या मातोश्री राधाबाई बापुराव नलावडे यांचे वृद्धापकाळाने निधन..

खरसुंडी येथे राहणारी ह. भ. प.राधाबाई बापुराव नलावडे यांचे शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.या वेळी त्या 90 वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता त्या सतत प्रयत्नशील असायच्या . ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि.26ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर येथे होणार आहे.तसेच त्यांचे उत्तरकार्य रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी खरसुंडी येथे त्यांच्या निवास स्थानी होणार आहे. यावेळी ह.भ.प.राजेश महाराज सावंत खांबेवाडी यांचे दररोज सायंकाळी 4ते6 गरुड पुराण वाचन होणार आहे . तसेच रविवार दिनांक 26/10/2025 रोजी सायंकाळी 6 ते 8 हनुमान प्रासादिक भजन मंडळ नडोदेवाडी यांची भजन सेवा होणार असून रात्री 9ते 11ह.भ.प.मारुती महाराज कोल्हटकर (खांब रोहा) यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार दिनांक 27/10/2025रोजी सायंकाळी 6ते 8ग्रामस्थ भजनी मंडळ खरसुंडी यांची भजन सेवा होणार असून रात्री 9ते 11ह. भ. प. संजय महाराज बारस्कर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार दिनांक 28/10/2025 रोजी सायंकाळी रामकृष्ण हरी भजनी मंडळ धामणी खोपोली यांची भजन सेवा होणार असून रात्री 9ते 11ह. भ. प. कृष्णा महाराज लांबे यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दिनांक 29/10/2025रोजी सकाळी 10 ते 11 ह. भ. प. राजेश महाराज सावंत यांचे प्रवचन होणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा यशवंत नलावडे, संदीप नलावडे, आत्माराम नलावडे आणि पुतणे,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे , जावई, असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!