Uncategorized

खोपोली प्रभाग क्रमांक ७ साठी जनतेची मागणी – सौ. ज्योती राकेश मिरवणकर यांना उमेदवारी द्यावी!

प्रभाग क्रमांक ७ मधील जनसामान्यांच्या मनामध्ये एक स्पष्ट भावना उमटत आहे – की *सामाजिक कार्यकर्ते श्री. राकेश रामचंद्र मिरवणकर* यांच्या पत्नी  सौ. ज्योती राकेश मिरवणकर यांनी या प्रभागातून येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत भाग घ्यावा.

श्री. राकेश मिरवणकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं आहे. पर्यावरण संरक्षणापासून ते गरजूंसाठी मदतकार्य, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, आजारी रुग्णांसाठी औषधांची मदत, अपघातग्रस्तांसाठी व्हीलचेअर, वॉकर, कमोड अशा सुविधा — हे सर्व *”शिवतीर्थ सामाजिक संस्था, श्रीरामनगर”* या संस्थेमार्फत सातत्याने केले जात आहे. तसेच राजे प्रतिष्ठान या संस्थेमार्फत सुद्धा त्यांनी विविध सामाजिक कामे पूर्ण तालुक्यात केलेली आहेत कोविड काळात सुद्धा त्यांनचा वाटा हा खूप मोठा होता पोलीस प्रशासन असो किंवा रुग्ण असो यांना मदतीसाठी नेहमी धावून जात होते.

त्यांच्या कार्यामुळे केवळ खोपोली नव्हे तर संपूर्ण *कर्जत-खालापूर तालुक्यात  एक सकारात्मक बदल दिसून येत आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

त्यांच्या पाठीशी उभा असलेला मजबूत मित्रपरिवार, आणि त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारे हजारो नागरिक हे त्यांचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे.

आज प्रभाग क्रमांक ७ मधील जनतेची मागणी आहे की, सौ. ज्योती मिरवणकर या त्यांच्या प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतराव्यात. कोणताही पक्ष त्यांना तिकीट देईल, त्या पक्षाचा संपूर्ण पॅनल या भागात बळकट होईल, असा लोकांचा विश्वास आहे. ही लढाई केवळ निवडणुकीची नाही, तर सामाजिक बदल आणि विकासासाठीची आहे.

जनतेच्या मनात स्थान असलेलेच, जनतेच्या सेवेस पात्र होतात!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!