खालापूरातील ह. भ.प. विनायक आत्माराम म्हात्रे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन
खालापूर, दिपक जगताप

खालापूरात नोकरी निमित्य आलेले विनायक महात्रे यांचे मूळ गाव वाशी वढावं परंतु अल्पवधीत खालापूर करांची मने जिंकले ले बापू अर्थात विनायक आत्माराम म्हात्रे यांचे 30/9/2025 रोजी खालापुरात अल्पशा आजाराने निधन झाले ईश्वर त्याचे आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना. वारकरी संप्रदाय याची आवड असणारे बापू हे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असायचे त्यांच्या निधनाने खालापूर तालुका पंचक्रोशीतील तसेच पेण तालुक्यातील वढाव गावामध्ये शोक व्यक्त होत आहे.त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार 9/10/2025रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर पाली येथे होणार आहेत तसेच उत्तर कार्य रविवार दि. 12/10/2025 रोजी खालापूर येथे होणार आहेत त्यांचे पश्चात पत्नी तीन मुलगे, किशोर म्हात्रे, सुधीर म्हात्रे, राजू म्हात्रे,सुना व नातवंड, पुतणे असा मोठा परिवार आहे बापू हे सरकारी फ़ॉरेस्ट खात्यात नोकरीला होते सदर सेवेत 21 नोव्हेंबर 1972 साली रुजू झाले त्या सेवेतून डिसेंबर 2008 रोजी सेवानिवृत्त झाले. एकूण 36 वर्ष सेवा केली एकदम निःस्वार्थ सेवा बजावली . त्यांचे घरी गरुड पुराण ग्रंथ श्रवण व भजन प्रवचन सारखे कार्य चालू आहे बापू चे जाण्याने महात्रे कुटुंबावर दुःखाचे सावठ आहे ते पेलण्याचे सामर्थ त्यांना मिळो हिच खरी श्रद्धांजली होय.